Tech Knowledge : मोबाईलमधले काँटॅक्ट्स उडालेत? असे करा रिस्टोअर

Tech Knowledge : मोबाईलमधले काँटॅक्ट्स उडालेत? असे करा रिस्टोअर

कधी मोबाईल फॉरमॅट मारला म्हणून तर कधी अन्य काही कारणांनी मोबाईलमधला सगळा डेटा डिलीट होतो. असे झाल्यावर आपली विनाकारण खूप चिडचिड होत राहते. इतर गोष्टी म्हणाव्या तितक्या महत्त्वाच्या नसल्या तरीही आपले काँटॅक्ट्स हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. आता हे गेलेले काँटॅक्ट्स परत मिळवेत यासाठी गुगलने एक अतिशय उत्तम सुविधा केली आहे. तुम्ही तुमचे काँटॅक्ट्स गुगलशी कनेक्ट केलेले असणे आवश्यक आहे. पण गेलेले हे सगळे काँटॅक्ट्स पुन्हा मिळविण्यासाठी नेमके काय करायचे ते पाहूयात…

१. आपल्या मोबाईल ब्राऊजरमध्ये गुगल काँटॅक्ट्स ही वेबसाईट ओपन करा.

२. यामध्ये मेन्यू या पर्यायावर क्लिक करुन मोअर या बटनावर क्लिक करा. त्यानंतर रिस्टोअर कॉन्टॅक्टस असा पर्याय येईल त्यावर क्लिक करा.

३. ज्या काळातील कॉन्टॅक्टस तुमच्याकडून डिलीट झाले असतील तो कालावधी यामध्ये टाका. त्यानंतर रिस्टोअर या पर्यायावर क्लिक करा.

४. यानंतर तुम्हाला तुमचे डिलीट झालेले सगळे काँटॅक्ट्स पुन्हा मिळू शकतील. मात्र ही प्रक्रिया काँटॅक्ट्स गेल्यापासून ३० दिवसांच्या आत करावी लागेल.

______________________________________

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?