बहुगुणी 'साखर'...!

👉 बहुगुणी 'साखर'...!

साखर आणि साखरेचे पदार्थ म्हटले कि, तोंडाला पाणी सुटलेच म्हणून समजा. पण फक्त पदार्थ गोड करण्यासाठी म्हणून साखर मर्यादित नाही तर ती तेवढीच बहुगुणी आहे. आज याबद्दल जाणून घेऊयात...

1) साखरेत नारळाचे तेल एकत्र करुन चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करा. चेहऱ्यावरची मृत त्वचा जाऊन साफ होते.

2) जास्त गरम खाल्ल्याने जीभ भाजली तर थोडी साखर तोंडात घाला, आराम मिळेल.

3) वाटलेली साखर कोमट पाण्यात एकत्र करुन कपड्यांना लावल्यास डाग निघून जातात.

4) हातांवर ग्रीस वा ऑईलचा डाग लागल्यास साखरेत ऑलिव्ह ऑईल एकत्र करून लावा.

5) राहिलेला केक पुन्हा कंटेनरमध्ये ठेवण्यापूर्वी खाली साखरेचे दाणे घाला. अधिक टिकेल.

6) चीजही फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी त्यावर साखर पसरवा. चीज बरेच दिवस टिकते.

7) केळ्याच्या पेस्टमध्ये ऑलिव्ह ऑईल आणि साखर एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्यास त्वचा कोमल होते.

8) व्हिनेगरमध्ये साखर एकत्र करुन फुलदाणीत ठेवल्यास फुले ताजी राहतात.

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.