आर्थिक चुका टाळण्यासाठी ’हे’ करा...!!!

👉 आर्थिक चुका टाळण्यासाठी ’हे’ करा...!!!

महागाई वाढत चालल्याने पैशाचे नियोजन करणे अवघडं होऊन बसलंय. परंतू, आपणच केलेल्या काही आर्थिक चूका उदा. नको तेवढा खर्च करणे वा कर्ज काढणे इ. आपणांस खूप वेळा अडचणीत आणतात. आपल्याकडून नेहमी होणाऱ्या या आर्थिक चुका टाळण्यासाठी काय करू शकतो? ते पाहुयात...

1) काही लोकांना उगाचच किरकोळ गोष्टींवर खर्च करण्याची सवय असते. जसं की, ’फर्स्ट डे फर्स्ट शो’ सिनेमा पाहणे किंवा घरूनच जेवणाची ऑर्डर देणे इ. हे खर्च सुरूवातीस छोटे-छोटे वाटत असतात परंतू कालांतराने ही सवय तुम्हाला तुमच्या मिळकतीपेक्षा जास्त खर्च करावयास शिकवते. जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणजे वॉरन बफेंनी दिलेला सल्ला असा की, मिळकतीतील काही टक्के रक्कम जरूर सेव्हींग करा.

2) महिन्याच्या किंवा वर्षांच्या सुरूवातीस भविष्यात होणाऱ्या खर्चाची यादी आणि त्यासाठी करावी लागणारी जुळणी, याचे सारासार प्लॅनिंग करा. त्या प्लॅनिंगमध्ये सेव्हींगचा देखील विचार करा.

3) हल्ली प्लॅस्टीक मनी (क्रेडीट/डेबीट कार्ड इ.) चा वापर करण्याची सवय सूविधा म्हणून चांगली आहे. परंतू आपण क्रेडीट कार्डचा रिपोर्ट बघणे अत्यंत जरूरी आहे. वेळीच रिपोर्टचा अभ्यास करा आणि पहा तुम्ही स्टेटसच्या नावावर अविचारी वापर केला आहे का नाही?

4) लवकरच पैसे मिळणार आहेत, वस्तू स्वस्त मिळत आहे म्हणून किंवा या-ना त्या कारणांमूळे आपण कर्जावर वस्तू घेत असाल तर सावधान. आपली ही सवय आपल्याला कर्जाच्या खाईत नेईल. त्यामुळे अती उसनवारी टाळाच.

5) स्वप्नातील गाडी, घर मिळवणे हे सहज शक्य असल्यास ठिकच परंतू घर, गाडी घेण्याच्या नादात महिन्याचे पैशाचे गणित बिघडवणे कधीही वाईट. लक्षात घ्या, मोठे घर, गाडी बरोबर इतर खर्चही तुमच्या पदरी पडतात. उदा. मेंटेनन्स, इंधन खर्च इ. तेव्हा इनव्हेंस्टमेंट करताना विचारपूर्वकच करा!

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?