भारतीय पदार्थांची इंग्रजीतील नावे...

👉 भारतीय पदार्थांची इंग्रजीतील नावे...

दररोजच्या संभाषणात अशा काही पदार्थांची नावे असतात जे आपण दररोज खातो. मात्र त्यांची इंग्रजी नावे फार कमी लोकांना माहीत असतात. म्हणून आज त्याबद्दल जाणून घेऊयात...

1) चिकू : बऱ्याचदा इंग्रजीतही अनेकदा chikoo असेच स्पेलिंग लिहिले जाते. मात्र चिकूचे इंग्रंजीत नाव Sapodilla असे आहे. 

2) बडिशेप : बडिशेपला हिंदीमध्ये सौंफ असे म्हटले जाते. अनेकदा इंग्रजीतही याचे नाव saunf असे घेतले जाते. मात्र बडिशेला इंग्रजीत fennel seeds असे नाव आहे.

3) दुधी भोपळा : दुधी भोपळ्याला हिंदीत लौकी असे म्हणतात. तर इंग्रजीत Bottle Gourd म्हणतात.

4) हिंग : हिंगला इंग्रजीत Asafoetida म्हणतात.

5) आवळा : आवळा अथवा आमलाला इंग्रजीत Gooseberry म्हणतात.

6) साबुदाणा : साबुदाण्याला इंग्रजीत Tapioca Sago असे म्हणतात.

7) ओवा : ओव्याला हिंदीत अज्वाईन असे म्हणतात. अनेकदा इंग्रजीतही याचा उच्चार Ajwain असा केला जातो. मात्र ओव्याचे इंग्रजी नाव Carom Seeds असे आहे.

8) मखाणे : ड्रायफ्रुट्समध्ये मखाण्याचा उल्लेख आवर्जून होतो. या मखाण्यांना इंग्रजीत Fox Nuts म्हणतात.

9) परवल : तोंडलीची मोठी जात म्हणजे परवल. या परवल भाजीला इंग्रजीत Pointed Gourd असे म्हटले जाते.

10) भजी : भजीला हिंदीत पकोडे म्हणतात. हेच पकोडे म्हणजे इंग्रजी भाषेतील Fritters होय.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?