Health Tips : थंडीमध्ये अंडी खाताय ? मग आधी हे वाचा

Health Tips : थंडीमध्ये अंडी खाताय ? मग आधी हे वाचा

थंडीमध्ये अंडे खाणं अनेकजणांना आवडते. अंड हे अनेकांचा आवडता पदार्थ आहे. पण अंड खाण्याआधी हे नक्की वाचा.

शरीरावर वाईट परिणाम
पैसे कमविण्यासाठी काही लोक आरोग्याशी खेळायलाही मागेपूढे पाहत नाहीएत. नकली अंड खाऊन लोकांच्या शरीरावर वाईट पारिणाम होत आहे.

त्यामूळे आम्ही तुम्हाला सांगत आहोत नकली आणि असली अंड कस ओळखाल.

अन्न विभागाकडे तक्रारी
शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या दुकानांतून प्लास्टिक अंडे जप्त करण्यात आली आहेत. अन्न विभागाकडे याच्या तक्रारीही गेल्या आहेत.

तुम्ही अंड्याच्या आतील भागाचा रंग पाहून खर-खोट अंड ओळखू शकाल. त्या अंड्याला हात लावून किंवा बघूनही हे अंड ओळखता येतं.

सफेद बाऊलचा वापर
सर्वसाधारण अंड्याच्या आतील पदार्थ हलक्या पिवळ्या रंगाचा असतो. पण प्लास्टिकवाल्या अंड्याच्या आतील पदार्थ घट्ट पिवळ्या रंगाचा असतो.

त्यामूळे अंडे शक्यतो सफेद बाऊलमध्येच फोडावे. त्यातून हा फरक तात्काळ लक्षात येईल.

बॉलप्रमाणे उडते
कॅल्शिअम कार्बोनेटचे आवरण तोडल्यानंतर कृत्रिम अंड्याच्या आतील हिस्सा असलीच्या तुलनेत कडक असतो.

आतली पिवळी चरबी पिवळ्या रबराच्या बॉलप्रमाणे होते. थोड्या उंचीवरून खाली टाकल्यास बॉलसारखी टप्पा खाते. ही धारदार वस्तूंनीच कापली जाते.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?