... म्हणून लवकर झोपायची सवय हवीच

... म्हणून लवकर झोपायची सवय हवीच

मोबाईलच्या चक्रामध्ये अडकलेल्या अनेकांच्या झोपेचेही चक्र बिघडलेले असते. अनेकदा त्यांच्या जेवणाच्या वेळे कडे लक्ष नसते. परिणामी झोपेवर परिणाम होतो. रात्रीच्या वेळेस भटकायला जाणं, फिरायला जाणं, मित्र मैत्रिणींसोबत टंगळमंगळ करणं तुम्हांला 'कूल' वाटत असले तरीही त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो.

चेहऱ्यावरील डाग कमी होऊ लागले:
लवकर झोपण्याचे परिणाम माझ्या चेहऱ्यावर दिसू लागले. माझे पिंपल्स कमी होऊ लागले. आणि डाग हळूहळू कमी व्हायला सुरवात झाली आहे.

आता ब्लड ग्लुकोज कमी होत नाही:
आधी महिन्यातून ३-४ वेळा तरी माझं ब्लड ग्लुकोज कमी व्हायचं. त्यामुळे काही तरी गोड पदार्थ चॉकलेट्स वगैरे मी सोबत ठेवत असे. पण योगायोग म्हणा किंवा झोपेचा परिणाम माझा hypoglycaemia चा त्रास पूर्णपणे नाहीसा झाला.

भूकेत सुधारणा झाली:
भूक लागत नाही हे कारण आता भूतकाळात जमा झाले. आता हेल्दी पदार्थ खावेसे वाटतात. पूर्वी खूप पिझ्झा, बर्गर, नुडल्स खाल्याने आता ते फारसे खावेसे वाटत नाहीत. आजकाल मी आधीपेक्षा अधिक चांगले आणि आरोग्यदायी पदार्थ खाते.

मायग्रेनचा त्रास कमी झाला:
आजकाल कमी खाणे, जास्त किंवा कमी झोप, खूप रडणे किंवा खूप हसणे या कशाही मुळे मला मायग्रेनचा त्रास जाणवत नाही. जेव्हापासून मी पुरेशी झोप घेऊ लागले तेव्हापासून माझा मायग्रेनचा त्रास कमी झाला. आणि आता मी कोणतीही गोळी न घेता राहू शकते.

कार्यक्षमतेत वाढ झाली:
८ तास पुरेशी आणि शांत झोप घेतल्यामुळे मी अधिक उमेदीने, तत्परतेने काम करू शकते. माझी कार्यक्षमता वाढली आहे. आता मला जाणवू लागले आहे की झोपेचा परिणाम कामावर होतो आणि पुरेशा झोपेमुळे कामही उत्तम होते.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?