काय ! पेनड्राईव्ह खराब झाला ...

काय ! पेनड्राईव्ह खराब झाला ...

पेनड्राईव्ह टेक्नोसॅव्ही तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालाय .एवढा कामाचा आणि इतका मोठा डाटा स्टोअर करुन ठेवणारा लाख मोलाचा ऐवज जपायलही हवा.अनेकांचा अनुभव असाही की पेनड्राईव्ह अगदी कालर्पयत व्यवस्थित काम करीत होता. कालच प्रेझेंटेशन त्यामध्ये कॉपी केलं होतं मात्र आज पेन ड्राईव्ह डिटेक्टच होत नाही. ऐनवेळी पेन ड्राईव्ह चालत नाही आणि प्रेझेंटेशन तर त्यातच आहे मग काय करणार ? पेनड्राईव्हची नीट काळजी घेतली तर आपल्यावर अशी परिस्थिती ओढावणार नाही .

अनेकांना पेनड्राईव्ह खिशात किंवा आपल्या वॉलेटमध्ये ठेवण्याची सवय असते, त्यामुळे होते काय की जर खिशात पेनड्राईव्ह ठेवला तर आपल्या शरीराच्या तापमानामुळे पेनड्राईव्हच्या इलेक्ट्रॉनिक्स कांपोनंटला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे पेन ड्राईव्ह शक्यतो खिशात ठेऊ नका

काहीजण एकदा पेनड्राईव्ह कॉम्प्युटरला जोडला की काम झाले तरी दिवसभर पेनड्राईव्ह कॉम्प्युटरलाच लावून ठेवता, त्यामुळे होते काय की, कॉम्प्युटरच्या युएसबी पोर्टला पॉवर सर्ज (पावर कमी-जास्त) झाल्यास पेनड्राईव्ह डॅमेज होण्याची शक्यता असते,त्यामुळे काम झाले की,

पेनड्राईव्ह हे इलेक्ट्रॉनिक कांपोनंट असलेले स्टोरेज माध्यम आहे. त्यामुळे कितीही काळजी घेतली तरी ते कधी खराब होईल याची गॅरंटी नाही, त्यामुळे पेन ड्राईव्हचा एक डेटा बॅकअप हा तुमच्याकडे असलाच पाहिजे आणि तो नियमित घ्यायला पाहिजे.

आजची टेक्नोसॅव्ही पिढी ज्याला ‘पीडी’ या लाडक्या नावाने संबोधते तो पेन ड्राईव्ह .आजकाल जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याकडे तसेच प्रत्येक टेक्नोसॅव्ही माणसाकडे पेनड्राईव्ह असतोच . जेव्हापासून ओटीजी पेन ड्राईव्ह आला आणि जवळपास सर्वच आघाडीच्या स्मार्टफोन मध्ये ओटीजी पेन ड्राईव्ह जोडण्याची सुविधा आल्यामुळे तर अनेक स्मार्टफोन युझर्स ओटीजी पेन ड्राईव्ह ठेवायला लागले. हा ओटीजी पेन ड्राईव्ह प्रकार तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय होतो आहे. पूर्वी पेन ड्राईव्ह स्मार्टफोनला जोडायचा असल्यास त्यासाठी ओटीजी केबल लागायची. आता मात्र या ओटीजी पेन ड्राईव्हमुळे तुम्ही ओटीजी केबल न वापरता थेट हा पेन ड्राईव्हच  डायरेक्ट स्मार्टफोनच्या मायक्रो यूएसबी पोर्टला लावू शकता. कारण या ओटीजी पेन ड्राईव्हच्या एका बाजूला युएसबी कनेक्टर असते, तर दुसऱ्या  बाजूला मायक्रो युएसबी कनेक्टर असते.

एकेकाळी फ्लॉपीचा जमाना होता. या फ्लॉपीला सीडीने रिप्लेस केले. पुढे सीडी, डीव्हीडीचा जमाना आला. आता मात्र पिटुकलं पेनड्राईव्ह या सर्वावर मात करीत तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालाय. (काही टेक्नोसॅव्ही गळ्यातील चेनला पेन ड्राईव्ह अडकवतात.) दिवसेंदिवस पेनड्राइव्हचा आकारही कमीकमी होताना दिसून येत आहे. सध्या बाजारात अतिशय लहान आकाराचे पेनड्राइव्ह उपलब्ध आहेत.हे पिटुकलं पेनड्राईव्ह आता दोन जीबीपासून तर एक टिबी (एक हजार चोवीस जीबी) र्पयतच्या क्षमतेचं झालं आहे.

आता हा एवढा कामाचा आणि इतका मोठा डाटा स्टोअर करुन ठेवणारा लाख मोलाचा ऐवज जपायलही हवा.अनेकांचा अनुभव असाही की पेनड्राईव्ह अगदी कालर्पयत व्यवस्थित काम करीत होता. कालच प्रेझेंटेशन त्यामध्ये कॉपी केलं होतं मात्र आज पेन ड्राईव्ह डिटेक्टच होत नाही. ऐनवेळी  पेन ड्राईव्ह चालत नाही आणि प्रेझेंटेशन तर त्यातच आहे मग काय करणार ? पेनड्राईव्हची नीट काळजी घेतली तर आपल्यावर अशी परिस्थिती ओढावणार नाही!

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?