आपल्या भावना बोथट झाल्यात का..?

👉 आपल्या भावना बोथट झाल्यात का..?

हवी-हवी वाटणारी माणसे हळू-हळू आपल्याला नको-नको वाटू लागतात. कारण ते त्यांच्या वागण्यानं आपल्याला जाता-येता हर्ट करत असतात आणि आपलं ’हार्ट’ बिच्चार ’हर्ट’ होत राहतं. खरंच आपले मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, कुटुंबीय इतके वाईट आहेत का? आपल्याला छळायचंच असं ठरवून सतत मुद्दाम अडवतिडव बोलतात का? कुणी काहीही म्हणो, काहीही सांगो, आपण आपले तिरक्यातच घुसून मोकळे...

थोडं काही झालं की, आपण लगेच ’हर्ट’ होतो. एक गोष्ट तर आपण कायमचं अनुभवतो. आपले काही मित्र-मैत्रिणी अचानक भेटतात. मग त्यांचा पार्टीचा बेत ठरतो, ते खूप एन्जॉय करतात आणि नंतर हे सगळं आपल्याला कळतं. त्यांचे सोशल मीडियावरचे फोटो पाहून किंवा त्यातला त्यात एखाद्या बिन महत्त्वाच्या मित्रांना त्यात पाहून तर आपण जाम ’हर्ट’ होतो. मुळात ते सगळे ठरवून तुम्हाला सांगत नाही असं नाही. तर कदाचित ते सहज बोलता-बोलता एकत्र आले असतील आणि गडबडीत सांगायचं राहून गेलं असेल, हे आपल्या डोक्यातचं शिरत नाही.

कधी असंही होतं कि, आपली जवळची व्यक्ती काळजीपोटी आपल्याविषयी दुसऱ्याला काहीतरी सांगते आणि आपण ते चुकून ऐकतो. बस्स, आपण लगेच हर्ट होतो. वाटतं, जे काय माझ्यात चूक आहे, ते मलाच सांगायचं ना, माझ्यामागे माझी गाऱ्हाणी, टिंगल करायची काय गरज आहे? आपण इतकं मनाला लावून घेतो की, मग विचारालायच नको...

कुणी काहीही म्हणालं तरी आपल्या भावना लगेच दुखावतात. इतक्या का नाजूक झाल्या आहेत आपल्या भावना? येता-जाता सहज दुखावल्या जातात. एक लक्षात घ्या, अशा गोष्टी आयुष्यात होतचं राहणार आहेत. कुणी काही बोललंच तर, आपण बोलावं तिथल्या तिथं हिशेब करून मोकळं तरी व्हावं, किंवा घडलेल्या घटनेमागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न तरी करावा. नाही तर ज्या कानानं ऐकलं त्याच कानानं सोडून तरी द्यावं. उगीच हर्टबिट होतं, भळभळत्या जखमा घेवून जगण्यात काय मज्जा... लाईफ एन्जॉय करता आलं पाहिजे...!

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?