करिअर : सल्लागार

👉 करिअर : सल्लागार

तुम्हाला विशिष्ट क्षेत्राचे ज्ञान आणि अनुभव असेल तर तुम्ही खालील विविध क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करू शकता…

1) व्यवस्थापन सल्लागार : यासाठी तुम्हाला व्यवस्थापनातील खाचाखोचा आणि बारकावे, मार्केट, ग्राहक यांचे अद्ययावत ज्ञान असणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या क्लायंटच्या गरजा समजून घेऊन त्यांना सल्ला देता आला पाहिजे. तुमच्या शिक्षणाची आणि अनुभवाची जंत्री जेवढी चांगली आहे तेवढं चांगलं.

2) मनुष्यबळ सल्लागार : हे एक फार विस्तीर्ण क्षेत्र आहे. मनुष्यबळाचे व्यवस्थापन, मनुष्यबळाचा विकास म्हणजे त्यांना ट्रेनिंग देणे आणि विविध मनुष्यबळ पुरवणे म्हणजे HR सर्विसेस अशा तीन गोष्टींचा समावेश होतो. तुम्ही एका वेळी एकच गोष्ट निवडणे योग्य आहे. विविध कंपन्याशी ओळखी वाढवण्यासाठी सेमिनार्स, विविध चेंबर्समध्ये नोंदणी, मटेरिअल, गाडी (असल्यास उत्तम) असेल तर उत्तमच. 

3) मार्केटिंग सल्लागार : तुम्ही जर, मार्केटिंग तज्ञ असाल तर नोकरी सोडून या क्षेत्रात सल्लागार म्हणून काम सुरु करा. मार्केटिंग सल्लागार एखाद्या उत्पन्नाच्या ब्रँण्डिगपासून ते त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचे सल्ले देत असतो. यामध्ये जाहिरात कशी कुठे करावी, किती खर्च करावा, ग्राहकांची नस कशी ओळखावी, काय उत्पादन करावे ते कसे कुठे, विकावे? लोगोचा रंग काय असावा, लोगो कसा असावा, तुमच्या उत्पादनाची एक लाइन काय असावी? या सर्व गोष्टींचा सल्ला मार्केटिंग सल्लागार देत असतो.

4) आर्थिक सल्लागार : एलआयसी एजंट किंवा एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीच्या एजंटपेक्षा हे वेगळे क्षेत्र आहे. यात क्लायंटची आर्थिक कमाई, क्षेत्र, खर्च या सर्वांचा गोषवारा घेऊन दर महिना किती गुंतवणूक करावी, गुंतवणुकीचे विशिष्ट ओकेजनसाठी पैसे साठवणे अशा सर्व गोष्टींचा सल्ला गुंतवणूक सल्लागार देतो. तो कुठल्याही विशिष्ट कंपनीशी बांधील नसतो. गुंतवणूक सल्लागार होण्यासाठी ‘फायनान्शिअल प्लॅनिंग बोर्ड ऑफ इंडिया’ चा गुंतवणूक सल्लागाराचा कोर्स करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला पदवी आणि मान्यता मिळते. तसेच विविध कर्जे मिळवून देणे, आर्थिक व्यवसाय सांभाळणे हि सुद्धा कामे आर्थिक सल्लागार करू शकतो.

5) पब्लिक रिलेशन / संवाद सल्लागार : पब्लिक रिलेशन म्हणजे एखाद्या संस्थेची मते, बातम्या आणि संवाद लोकांपर्यंत पोहोचवणे. तुम्ही जर्नलिझम किंवा पब्लिक रिलेशनमध्ये असाल तर तुम्हाला या क्षेत्रात स्वतःचा ठसा निर्माण करता येईल. यासाठी तुमच्याकडे कल्पकता, सृजनशीलता आणि ग्राहकांच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे आणि गरजेप्रमाणे त्याला संवादाच्या, माध्यमाचा सल्ला देता आला पाहिजे. तुमचे पत्रकार, पत्रकार संघ यांच्याशी चांगले संबंध असणे आवश्यक आहे.

महत्वाचे म्हणजे हे सर्व उद्योग सेवा उद्योग असल्याने तुम्ही आणि तुमचे ज्ञान/ कौशल्य हे त्याला लागणारे सर्वात मोठे भांडवल आहे. त्यामुळे तुमच्यामधील कौशल्याचा उपयोग करा आणि भरपूर कमाई करा!

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?