स्टाईल दिवा ’दीपिका पदुकोण’

👉 स्टाईल दिवा ’दीपिका पदुकोण’

लाखो मुलींसाठी स्टाईल दिवा असणाऱ्या दीपिकाचा आज जन्मदिवस. बॅडमिंटनपटूपासून ते एक यशस्वी अभिनेत्री बनणाऱ्या दीपिकाचा हा प्रवास आज जाणून घेऊयात...

दीपिका पदुकोणचा जन्म 5 जानेवारी 1986 रोजी डेन्मार्कच्या कोपेनहेगन येथे झाला. दीपिका प्रसिध्द बॅटमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे आणि तिची आई उज्वला एक ट्रॅव्हल एजंट आहेत. दीपिकासुध्दा एक बॅटमिंटन खेळाडू आहे. ती राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर बॅटमिंटन आणि बेसबॉस खेळली आहे.

बंगळूरु येथून शालेय शिक्षण आणि माउंट कॅरमल महाविद्यालयातून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. जेव्हा ती पदवीचे शिक्षण घेत होती तेव्हा तिला मॉडलिंगची ऑफर आली होती. तिने मॉडलिंग एक छंद म्हणून केली, परंतु नंतर तिने या छंदाला गांभीर्याने घेतले आणि अनेक जाहीरातीत ती झळकली. म्हटले जाते, की दीपिकाला अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. तिच्या म्हणण्यानुसार फिल्म इंटस्ट्रीमध्ये येण्याचा तिने कधीच विचार केला नव्हता. मात्र पुढे जाऊन बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी दीपिका आज यशस्वी अभिनेत्रींमध्ये सामील आहे. 

दीपिकाने बॉलिवूडमध्ये ‘ओम शांती ओम’ सिनेमामधून पदार्पण केले. हा सिनेमा 2007 मध्ये रिलीज झाला होता. तिला पहिल्याच सिनेमात बॉलिवूड किंग खानसोबत काम करायची संधी मिळाली. हा सिनेमा हिट झाला आणि त्यानंतर दीपिकाच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धूम घातली. दीपिकाने अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे गिरवले आणि शामक डावर यांच्याकडून डान्स शिकली. दीपिकाचा ‘ऐश्वर्या’ हा कन्नड भाषेतील पहिला सिनेमा होता. ‘ये जवानी है दिवानी’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, आणि ‘गोलियों की रासलीला-रामलीला’, ’हॅपी न्यू इयर’, ’ये जवानी है’ ’दिवानी’, ’पिकू’, ’रामलीला’, ’बाजीराव मस्तानी’ हे ब्लॉकबस्टर चित्रपट दीपिकाने दिले आहेत.

👉 दीपिकाविषयी माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात...

1) दीपिकाला तिच्या एका फॅनने तिला एकदा एका फेसबुक लाईव्हमध्ये विचारले होते की, तूला कोणती सुपर पॉवर तुझ्याकडे ठेवायची आहे. त्यावर दीपिकाने व्हॅक्यूम क्लीनर असे उत्तर दिले. कारण तिला अजिबातच धूळ सहन होत नाही.

2) दीपिकाने ‘पीकू’मध्ये तिच्यासोबत असलेल्या इरफान खान या अभिनेत्यासोबत पुन्हा-पुन्हा काम करायला आवडेल, असे सांगितले होते.

3) दीपिका खूप शांत राहते आणि लोकांचं निरीक्षण करते. कॅफेमध्ये, एअरपोर्ट्वर मी विचार करत असते की, त्यांची कहाणी काय आहे. ते कुठून आले आहेत. माझ्या मनात अशा कहाणी सुरू असतात’.

4) दीपिकाने सांगितले होते की, रिकाम्या वेळात तिला घरी राहणं आणि घरातील कामं करणं पसंत आहे. जेव्हा हॉलिवूड सिनेमाचं शूटिंग टोरोंटोमध्ये करत होती तेव्हा तिला चार महिने एकटं रहावं लागलं होतं. त्यावेळी ती स्वत:साठी जेवण बनवणे, घराची सफाई करणे आणि कपडे धुणे आदी काम करत होती.

5) दीपिकाचं सर्वात जास्त प्रेम झोपेवर आहे. तिला झोपणे खूप पसंत आहे आणि ती कुठेही झोपू शकते.

6) परफेक्ट फिगरसाठी दीपिका जिममध्ये मेहनत घेते. पण त्याचाही कंटाळा येतोच. यावर दीपिका म्हणाली होती की, ‘जर वर्कआऊट शिवाय फिगर परफेक्ट राहिला असतं तर बरं झालं असतं’.

7) जेव्हा दीपिकाला विचारण्यात आले की, तूला कोणती भूमिका पुन्हा करायची आहे. तर तिने कशाचाही विचार न करता उत्तर दिले ‘पीकू’.

8) दीपिका कुठेही बाहेर जाताना सोबत एका पाऊचमध्ये सेफ्टी पिन, सुई-धागा, हूक, बॅण्डएड, नेल फायलर, बिस्कीट, मिंट आणि पर्फ्यूम सोबत ठेवते.

9) ‘मी माझ्या वडीलांकडून खूप शिकले आहे. आपल्या प्रायोरिटींवर फोकस करणे गरजेचे असते. तुमच्या जीवनात काय आवश्यक आहे हे तुम्हाला माहिती असायला हवं. टीका चांगली गोष्ट आहे. मी एक खेळाडू असल्याने टीकेकडे सकारात्मक दृष्टीने बघते’. असं दीपिका सांगते.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?