ह्या ६ गोष्टी करत राहिलात तर करिअरमध्ये १००% यशस्वी व्हाल!

ह्या ६ गोष्टी करत राहिलात तर करिअरमध्ये १००% यशस्वी व्हाल!

आपल्या जीवनामधील प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईलच असे नाही. या जीवनामध्ये आपल्याला कितीतरी समस्यांचा सामना करावा लागतो. पण कधी-कधी हे प्रॉब्लेम्स काही केल्या आपला पाठलाग सोडण्याचे नाव घेत नाहीत. त्यातीलच एक म्हणजे आपले करियर.

आपल्या करियरला एक समस्या म्हणणे थोडे चुकीचेच आहे, पण काहींना आपल्या जीवनातील हीच सर्वात मोठी समस्या वाटते. कितीही प्रयत्न केले, तरीदेखील त्यांचे करियर काही प्रगतीपथावर येत नसते.

एखाद्या माणसाकडे कौशल्य असूनही त्याला यशस्वी होण्यासाठी खूप झटावे लागते. पण रोजच्या काही सवयींमुळे तुम्ही तुमच्या करियरवर चांगला प्रभाव पाडू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुमचे करियर घडवण्यात तुम्हाला मदत करू शकतात. अशा काही चांगल्या सवयींबद्दल..

१. नेहमी वाचन करा
हे ऐकून तुमहाला थोडा धक्का बसला असेल. पण घाबरू नका, आम्ही काही तुम्हाला दररोज नवनवीन पुस्तके वाचण्यास सांगत नाही. वाचनामध्ये बऱ्याच भिन्न गोष्टी येतात. फक्त मोठमोठी पुस्तके वाचणे, म्हणजेच काही वाचन नाही.

काहीवेळा एखादा ब्लॉग पोस्ट, वर्तमानपत्र वाचणे हे देखील वाचनच आहे. इतर दिवसांमध्ये तुम्ही झोपते वेळी पुस्तकाची चार-पाच पाने वाचू शकता.

स्मार्ट लोक कधीही उद्योग समूहाच्या बातम्या जाणून असतात किंवा प्रोफेशनल डेव्हलपमेंट बुक डाउनलोड करून नेहमी एक पाऊल पुढे राहतात. वाचनामुळे  आपण नेहमी नवनवीन काहीतरी शिकू शकतो. त्यामुळे आपल्याला सतत नवीन कल्पना, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोण येतो. आपल्याला नंतर कोणताही निर्णय घेताना त्याचा फायदा होतो. वाचन करून आपण आपले करियर चांगल्याप्रकारे घडवू शकतो.

२. विशेष गुणांवर लक्ष केंद्रित  करा
आपण परफेक्ट बनण्यासाठी नेहमी आपल्या कमकुवतपणावर कितीतरी तास घालवतो. ज्या गोष्टींसाठी आपली नैसर्गिक पात्रता नसते, अशा गोष्टींवर लक्ष देऊन आपण आपला वेळ फुकट घालवत असतो. काही संशोधनात असे लक्षात आले आहे की,

कामाच्या ठिकाणी आपल्या कमकुवतपणापेक्षा आपल्या ताकदीवर लक्ष केंद्रित करणारे लोक कधीही तणावात राहत नाहीत आणि सुखी व आरोग्यमय बनतात.

प्रत्येकजण काही सारखाच बनलेला नाही. त्यामुळे कधीही आपल्या ताकदीवर म्हणजेच तुमच्यामध्ये असलेल्या विशेष गुणांवर लक्ष केंद्रित करा. असे केल्यामुळे तुमच्या करियरवर नक्कीच याचा चांगला परिणाम होईल.

३. लिहित रहा.
वाचनाप्रमाणेच लिहिणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. तुम्ही कोणत्या फिल्डमध्ये आहात, याचा लिहिण्याशी काहीही संबंध नाही. नेहमी काही न काही लिहीत रहा, जेणेकरून तुमची विचार करण्याची क्षमता वाढेल. तुमच्या विचारांना लिहून काढण्याचा प्रयत्न करा.

एखादा ब्लॉग सुरु करा किंवा लिंक्ड इन वर लिहा. तुम्ही तुमच्या रोजच्या घडामोडींना एखाद्या डायरीमध्ये लिहून ठेऊ शकता, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला पुढे होईल.

४. प्रश्न विचारा
कधीही कुणालाही प्रश्न विचारण्यासाठी लाजू नका. नेहमी आपल्या मनामध्ये तयार झालेला कोणताही प्रश्न त्याच्या संबंधित लोकांना विचारा, कारण जोपर्यंत तुम्हीच प्रश्न विचारात नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही गोष्टीची पुरेपूर माहिती मिळणार नाही. कोणत्याही गोष्टींमध्ये मदत घेण्यासाठी संकोच बाळगू नका.

आपल्या मित्रांना, आजूबाजूच्या लोकांना, ऑफिसमधील लोकांना, इतर अनुभवी लोकांना आपल्या मनामधील आलेले विविध प्रश्न विचारा. कधीही आपला गर्विष्ठपणा त्यामध्ये आणू नका.

कारण त्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची योग्य ती माहिती मिळणार नाही. तुमच्या करियरसाठी याचा नक्कीच फायदा होईल.

५. मदतीचा हात द्या
एका सुप्रसिद्ध चीनी व्यावसायिकाचे असे म्हणणे होते की,

“जर तुम्हाला आयुष्यभर सुख हवे असेल, तर एखाद्याला नक्की मदत करा.”

२०१२ मध्ये वॉल स्ट्रीट जर्नल (युरोप) आणि आयओपरन इन्स्टिट्यूट फॉर पीपल अँड परफॉर्मन्सच्या एका स्टडीमध्ये असे दिसून आले होते की, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त कामगार हे त्यांच्या सहकाऱ्यांना मदत केल्यामुळे त्याच्या आनंदात असतात. त्यामुळे कधीही आपल्या सहकाऱ्याला मदत करायला पुढे जा. तुमची टीम नेहमी आनंदी राहील. याचा फायदा तुमच्या करियरला देखील होईल.

आता जर तुम्ही एखाद्याला मदत केलीत, तर येणाऱ्या काळामध्ये तो ही तुमची योग्य ती मदत करू शकतो.

६. सोशल मीडियापासून लांब रहा.
तंत्रज्ञान हे बदलासाठी उत्प्रेरक असू शकते, परंतु त्यापैकी बरेच काही तुमची उत्पादन क्षमता रोखू शकते. सोशल मीडियाचा अतिवापर झाल्यास ते तुमच्या करियरसाठी धोकादायक ठरू शकते. सोशल मीडियावर जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत, तेवढयाच वाईट गोष्टी देखील आहेत. त्यामुळे तुम्हीं सोशल मीडियाच्या मोहात पडल्यास तुमच्या कामापासून तुमचे लक्ष विचलित होईल. त्यामुळे कामाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी कामाच्या दिवसांमध्ये सोशल मीडियापासून स्वतःला काही काळाचा ब्रेक द्या.

या वेळेमध्ये तुमच्या मनाला विश्रांती मिळेल आणि तुम्हाला तुमच्या उर्वरित कामाचा पाठ पुरवठा करता येईल.

अशाप्रकारे तुम्ही वरील गोष्टी आपल्या रोजच्या जीवनामध्ये आचरणात आणून तुमचे करियर चांगल्याप्रकारे घडवू शकता.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?