केस पातळ होऊ नये म्हणून ‘हे’ करा

केस पातळ होऊ नये म्हणून ‘हे’ करा

आपले केस जाड, काळेभोर आणि लांब असावेत असे जवळपास सगळ्यांनाच वाटत असते. पण प्रदूषण, शाम्पूचा भडीमार आणि इतर अनेक गोष्टींमुळे केस पातळ होतात. तसेच ते गळण्याचे प्रमाणही वाढते. पण केसांचा पोत चांगला रहावा यासाठी काही प्रयत्न केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. महिलांचे सौंदर्य तर त्यांच्या केसातच असते असे म्हटले जाते. केसांचा पोत सुधारावा आणि ते जाड व्हावेत यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. पण त्याचबरोबर चुकीच्या गोष्टींमुळे त्यांच्यावर वाईट परिणाम होतात. या गोष्टी टाळणे आवश्यक असते. केसांच्या आरोग्यासाठी ज्याप्रमाणे उत्तम तेल आणि शाम्पू गरजेचा असतो. त्याचप्रमाणे आहार आणि इतरही गोष्टी केसांचे आरोग्या चांगले राहण्यासाठी तितक्याच आवश्यक असतात. पाहूयात नेमके काय केल्याने केसांचा पोत सुधारण्यास मदत होईल.

१. केसांना चांगला मसाज करा
केस पातळ होत असल्याची तक्रार असल्यास केसांना मसाजची आवश्यकता आहे हे वेळीच लक्षात घ्यावे. मसाजसाठी ऑलिव्हचे तेल, खोबऱ्याचे तेल तसेच आवळ्याच्या तेलाचा वापर केल्यास फायदेशीर ठरतो. हलक्या हाताने मसाज करणे आवश्यक असते. त्यामुळे रक्ताभिसरण क्रिया योग्य पद्धतीने होण्यास मदत होते. यामुळे केसांची मुळे सशक्त होतात आणि केसगळती कमी होते.

२. योग्य आहार
केसांचे पोषण होण्यासाठी त्याची वरुन काळजी घेणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे त्याचे शरीरातूनही पोषण होणे तितकेच आवश्यक असते. शरीरातील झिंक आणि लोह यांची पातळी कमी झाल्यास केस गळण्यास सुरुवात होते. केस वाढण्यासाठी आणि त्यांचा पोच सुधारण्यासाठी आहारात सर्व जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात असणेही तितकेच आवश्यक असते.

३. केसांशी निगडीत उपकरणे
आपण केस विंचरण्यासाठी ते वाळवण्यासाठी किंवा त्याचे सेटींग करण्यासाठी वेगवेगळी उपकरणे वापरत असतो. ही उपकरणे केसांच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. त्यामुळे केस गळणे, केस तुटणे, त्यांची गुणवत्ता खराब होणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे ड्रायर, आयर्न यांसारख्या गोष्टी वापरताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

४. केस घट्ट बांधू नका
हेअरस्टायलिंगच्या उत्पादनांबरोबरच तुम्ही ते कसे बांधता हेही तितकेच महत्त्वाचे असते. तुम्हाला केस खूप घट्ट बांधण्याची सवय असेल तर त्यामुळे ही केस तुटू शकतात आणि मग पातळ होण्यास सुरुवात होते. अनेकदा केस घट्ट बांधल्याने त्यांचे गळण्याचे प्रमाणही वाढते. म्हणून केस घट्ट बांधण्याची सवय असेल तर ती त्वरीत थांबवायला हवी.

५. डॉक्टरांचा सल्ला घ्या
घरात शक्य तितके उपाय करुनही काहीच उपयोग होत नसेल तर केसांचे आरोग्या चांगले रहावे यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. थायरॉईड, केसांच्या मूळांना झालेला संसर्ग, त्वचेच्या तक्रारी यांसारख्या अडचणींमुळेही केस गळू शकतात. त्यामुळे वरील उपाय करुनही काही उपयोग होत नसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?