'नार्को' टेस्ट म्हणजे काय?

👉 'नार्को' टेस्ट म्हणजे काय?

समोरचा विश्वास ठेवत नसेल तर एखादी गोष्ट कशी मारून न्यायची, वेळप्रसंगी रेटून खोटं कसं बोलायचं हे आपल्या लहानांपासून-थोरांपर्यंत सर्वांना अगदी छान जमतं, हो कि नाही? विशेष करून गुन्हेगारी क्षेत्राबाबत न बोललेलंच बरं. कधी-कधी पोलिसांना गुन्हेगारांसमोर हाथ देखील जोडावे लागतात. मग अशावेळी पोलिसांना या लोकांकडून खरे जाणून घेण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करणे भाग पडते. अनेकदा तुम्ही नार्को टेस्ट बद्दल ऐकलं असेल पण नेमकं नार्को टेस्ट म्हणजे काय? हे आपल्याला फारसं माहिती नसतं म्हणून नेमका हा प्रकार काय आहे त्यावर एक नजर टाकूयात...

👉 'नार्को' टेस्ट म्हणजे काय?

'नार्को' टेस्ट म्हणजे एखाद्या आरोपीकडून किंवा माणसाकडून सत्य काय आहे, हे जाणून घेणे. ही टेस्ट करताना समोरचा व्यक्ती खोटे बोलणे शक्य नसते किंवा तो खोटे बोलला तरी त्याचे खोटं लगेचच पकडले जाते. 'नार्को' शब्द हा नार्क शब्दापासून घेण्यात आला आहे, ज्याचा अर्थ नार्कोटिक. हॉर्सलेमध्ये पहिल्यांदा 'नार्को' या शब्दाचा प्रयोग करण्यात आला होता. 1922 मध्ये रॉबर्ट हाऊस, टेक्सस येथे एका ऑब्झेटेशियनने स्कोपोलेमाइन ड्रगचा प्रयोग दोन कैद्यांवर केला होता तेव्हापासून 'नार्को' हा शब्द वापरण्यात येऊ लागला.

कशी करतात नार्को टेस्ट?

👉 खोटं बोलताना आपण कल्पनांचा आधार घेतो, पण ही टेस्ट करत असताना आरोपीला अर्ध बेशुद्ध अवस्थेत आणले जाते.

👉 यासाठी आरोपीला सोडियम पेंटोथॉलचे इंजेक्शन दिले जाते. हे इंजेक्शन आरोपीचे वय, लिंग, आरोग्य आणि शारीरिक स्थिती यांच्या आधारावर देण्यात येते.

👉 नार्को टेस्टमध्ये प्रश्नांची उत्तरे देत असताना तो व्यक्ती पूर्णपणे शुद्धीत नसतो, त्यामुळे तो प्रश्नांची खरी उत्तरे देतो, कारण त्यावेळी तो व्यक्ती उत्तरांना उलट-सुलट फिरवण्याच्या परिस्थितीमध्ये नसतो.

👉 तो व्यक्ती एकप्रकारच्या संमोहन अवस्थेमध्ये गेलेला असतो, तो त्याच्या बाजूने जास्त काही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो, फक्त विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरे देऊ शकतो.

👉 या परिस्थितीमध्ये व्यक्तीला खोटे बोलणे सहसा शक्य नसते, तरीसुद्धा काही लोक या अवस्थेमध्ये देखील खोटे बोलून विशेषतज्ञांना चुकीची माहिती देतात. पण अशा गोष्ट अपवादात्मक आढळतात.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?