एटीएममधून निघणाऱ्या रिसिप्टमुळे कॅन्सरचा धोका...

एटीएममधून निघणाऱ्या रिसिप्टमुळे कॅन्सरचा धोका...

कॅन्सर टाळण्यासाठी आपण बीपीए फ्री वॉटर बॉटल वापरतो. त्यासाठी सतर्क राहतो. मात्र हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एटीएम मधून निघालेल्या रिसिप्टमुळे देखील कॅन्सर होऊ शकतो. अभ्यासानुसार, ही रिसिप्ट थर्मल पेपरपासून बनते. ज्यामुळे तुम्हाला कॅन्सरचा धोका आहे.

कसा होतो कॅन्सर?
थर्मल पेपरवर बीपीएचे कोटींग असते. हा घटक घरातील इतर सामानातही असतो. मशीनमधून जेव्हा रिसिप्ट निघते तेव्हा ती गरम असते. त्यामुळे बीपीए अगदी सहज त्वचेवर ट्रांसफर होऊ शकतात.
एटीएम शिवाय कॅश रजिस्टर आणि कार्ड स्वाईप मशीनमध्येही थर्मल पेपरचा वापर होतो.

बीपीए धोकादायक आहे का?
बीपीए किंवा बिस्फेनॉल ए हे एक धोकादायक रसायन असते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हे रसायन थायरॉईड, इनफर्टिलिटी, वजन वाढणे आणि हृद्य रोगाचे कारण होऊ शकते.

पेपरला स्पर्श केल्याने काय होते?
त्वचा कोरडी असल्यास बीपीए कोटेड थर्मल पेपर पाच सेकंद हातात पकडल्यास त्वचेच्या माध्यमातून मायक्रोग्रॅम बीपीए ट्रांसफर होतात. पण जर तुमचा हात ओला किंवा त्याला घाम आलेला असेल तर बीपीए ट्रांसफर होण्याची संख्या दहापटीने वाढते. याचा अर्थ दिवसाला दहा तास असे पेपर, रजिस्टर पकडल्यास त्यातून ७१ मायक्रोग्रॅम बीपीए ट्रांसफर होऊ शकतात.

ही काळजी घ्या
उपचारापेक्षा आधीच काळजी घेणे योग्य. ही रिसिप्ट हातात पकडणे टाळा. थर्मल पेपरच्या वस्तूला हात लावू नका. शक्यतो हातात ग्लोज घालून थर्मल पेपर हातात पकडा.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?