सर्दीवर रामबाण ठरतील हे '७' उपाय!

सर्दीवर रामबाण ठरतील हे '७' उपाय!

सर्दी-खोकला झाल्यास जीव अगदी नकोसा होतो. काय करावे सुचत नाही. पण त्यावर काही रामबाण असे घरगुती उपाय आहेत. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.  मग हे उपाय नक्की करून बघा...

गरम पाणी
सर्दी झाल्यास दिवसातून तीन-चार वेळा गरम पाणी प्या. काही खाल्यानंतर देखील गरम पाणी प्या. त्याचबरोबर गरम पाण्यात मीठ घालून सकाळ-संध्याकाळ गुळण्या करा.

हळदीचे दूध
रात्री झोपण्यापुर्वी गरम दूधात हळद घालून प्या. सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. मात्र त्यानंतर थंड पाणी पिऊ नका.

मोहरीचे तेल
एक चमचा मोहरीचे तेल कोमट करून २-२ थेंब नाकपुडीत घाला. त्यामुळे सकाळी उठल्यावर खूप बरे वाटेल. असे २-३ दिवस करा.

वेलची
सर्दीत वेलचीच्या सेवनाने आराम मिळतो. एक वेलची घेऊन ती बारीक करा. त्यात २ चमचे मध घालू्न ते चाटण खा. असे नियमित २-३ दिवस करा.

लसूणचे सूप
लसणाच्या पाकळ्यांची साल काढून त्या बारीक करून घ्या. त्यानंतर त्या पाण्यात घालून उकळा. पाणी नीट उकळल्यानंतर ते गाळून प्या.

आलं आणि लिंबाचा चहा
एक कप पाण्यात आलं, काळीमिरी, लवंग घालून उकळा. त्यात अर्धा लिंबू पिळा. हा चहा दिवसातून कमीत कमी तीनदा घ्या. याशिवाय दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा दूधात घालून प्या.

पुदीन्याचा चहा
पुदीना आणि तुळस घालून चहा प्या. त्यात तुम्ही काळीमिरी, लवंग घाला. अधिक फायदा होईल.

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.