अर्थसंकल्प गुप्त का ठेवला जातो..?

👉 अर्थसंकल्प गुप्त का ठेवला जातो..?

येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री अरूण जेटली 2018-19 साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. बजेटबद्दल आपल्या प्रत्येकाला कमालीची उत्सुकता असते. मात्र अर्थसंकल्प संसदेत सादर होईपर्यंत तो अतिशय गुप्त का ठेवला जातो याचे कारण तुम्हाला माहित आहे का? नाही तर आज जाणून घेऊयात...

असे सांगितले जाते कि, 1947 साली ब्रिटनच्या संसदेत लेबर चान्सलर एडवर्ड डोल्टन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी केली होती. मात्र अर्थसंकल्प सादर करण्याच्या आदल्या दिवशी एक पत्रकार त्यांना भेटायला आला तेव्हा त्यांनी अर्थसंकल्पातील कर प्रस्तावांची माहिती नकळत त्याला दिली. सायंकाळच्या वर्तमानपत्रात त्या संदर्भातल्या बातम्या आल्यानंतर एडवर्डना त्यांची चूक समजली व त्यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून ब्रिटनमध्ये अर्थसंकल्प गुप्त ठेवण्याची प्रथा सुरू झाली व भारतानेही हीच प्रथा स्वीकारली.

स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 ला सादर केला गेला. 1955-56 सालापर्यंत अर्थसंकल्प इंग्रजीतून सादर केला जात. मात्र बहुसंख्य जनतेला तो समजत नाही असे लक्षात आल्यानंतर तो हिंदीत सादर केला जाऊ लागला. स्वातंत्र्यानंतर 9 वर्षांनंतर अर्थसंकल्प सायंकाळी 5 वा. सादर करण्याची प्रथा पडली होती. ती माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मोडली व 2001 पासून अर्थसंकल्प सकाळी 11 वा.सादर केला जातो.

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.