प्रेरणास्त्रोत जिजाऊमाता...!

👉 प्रेरणास्त्रोत जिजाऊमाता...!

आपल्या मातीच्या स्वाभीमानासाठी अन् अभिमानासाठी शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी लढणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज अन् छत्रपती संभाजीराजे यांना घडविणाऱ्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची आज जयंती. खरंच राजमाता जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि गरीबांप्रति प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे. त्याविषयी आज थोडं जाणून घेऊयात... 

* जिजाऊंनी विवाहानंतर स्वराज्य संकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले.

* केवळ आपली जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका शहाजीराजे-जिजाऊमातांची होती.

* अदिलशहा, निजाम, मुघल असे बलाढ्य विरोधात असताना मोठ्या निर्भिडपणे जिजाऊमाता शहाजीमहाराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या.

* जिजाऊंनी स्वत:च्या जाधव-भोसले कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला. त्यामुळे सर्व जाती धर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पणासाठी पुढे आले. म्हणजे जिजाऊंनी आपले मातृप्रेम शिवरायांप्रमाणेच सर्व मावळ्यांवर केले. त्यामुळे जिजाऊ स्वराज्यमाता आहेत.

* स्वराज्यावर अनेक संकट आली. याप्रसंगी जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. संकटसमयी जिजाऊ लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या.

* शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य जिजाऊंनी केले. शिवरायांच्या मोठेपणाचे श्रेय जिजाऊंना जाते.

* राजमाता जिजाऊ शिवरायांना यश मिळावे यासाठी यज्ञ, तप, शांती, उपवास करीत बसल्या नाहीत. यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते, चातुर्य पणाला लावावे लागते, प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. यावर जिजाऊंचा दृढ विश्वास होता. कारण जिजाऊ प्रयत्नवादी होत्या.

* पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार करणारी जिजाऊमाता म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ आहे.

* शिवाजीराजे-संभाजीराजे मावळे यांच्यामध्ये असणारी उच्चकोटीची नैतिकता जिजाऊंच्या संस्कारातून आलेली आहे. 

* प्रतिकुल परिस्थितीत जिजाऊंनी हतबल, निराश न होता मोठ्या हिंमतीने संकटावर मात करून स्वराज्य निर्माण केले.

जिजाऊंचा हा आदर्श आजच्या महिलांनी अंगिकारला पाहिजे. आज देखील शिवरायांसारखे पराक्रमी, मानवतावादी नेते उदयाला येतील पण त्याअगोदर जिजाऊंसारखी माता घरोघरी निर्माण झाली पाहिजे. जिजाऊंची हिंमत आजच्या महिलांमध्ये यावी, एवढीच जिजाऊं चरणी प्रार्थना करूया...

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.