... म्हणून नाश्त्याला चहा चपाती खाणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं

Health Tips : ... म्हणून नाश्त्याला चहा चपाती खाणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं

दिवसाची सुरूवात भरपेट नाश्ता, त्यानंतर जेवण आणि त्याहून हलके रात्रीचे जेवण असा ठेवल्यास तुमचे आरोग्य स्वास्थ्यकारक राहण्यास मदत होते. 

आजकाल सारेच जण घाईत असतात अशावेळी सकाळी उठून नाश्त्या करणं अनेकांना जमत नाही. तर काही जण घाई घाईत बाहेर पडताना रेडी टू इटचे काही पदार्थ खाणं पसंत करतात. परंतू अनेक घरात आजही सकाळी बनणारी गरम गरम चपाती आणि चहा हा नाश्त्याचा हमखास पदार्थ आहे. पण चहा चपाती खाऊन बाहेर पडणं खरंच हेल्दी आहे का ?  

एक्सपर्ट सल्ला 
आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार, नाश्त्याला चहा चपाती हा पर्याय फारसा आरोग्यदायी नाही. चहा चपाती एकत्र खाल्ल्याने त्यामधून मिळणारी पोषकद्रव्य फारच कमी असतात. 

सकाळी उठल्यानंतर शरीराला दिवसभर लागणारी उर्जा सकाळच्या नाश्त्यामधून मुबलक मिळणे गरजेचे आहे. सकाळच्या नाश्त्यामधून कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन घटक मुबलक मिळणे गरजेचे आहे. चहा चपातीमधून ही गरज पूर्ण होत नाही. चहा चपाती हा पर्याय आवश्यक असणारी कार्बोहायड्रेट, आयर्न आणि कॅल्शियमची गरज पूर्ण करत नाही. 

चूकीचे कॉम्बिनेशन 
चहा हे कॅफिनयुक्त पेय असल्याने दिवसाची सुरूवात त्याने करणं आरोग्यदायी नाही. कोणताही अन्नपदार्थ चहासोबत घेणे त्रासदायकच आहे. तसेच चहा चपाती  या कॉम्बिनेशनमधून आयर्न आणि कॅल्शियम शरीरात मुबलक प्रमाणात शोषले जात नाही. परिणामी हा नाश्त्याचा पर्यायामधून शरीराला उर्जा आणि पोषणद्रव्य यापैकी काहीच मिळत नाही. 

नाश्त्याला हेल्दी पर्याय कोणते ?
चहा चपाती हा झटपट पर्याय वाटत असला तरीही फारसा उपयोगी नाही म्हणून त्याऐवजी भाजी चपाती किंवा दही चपाती , अंड, दूध,पनीर यांचा समावेश करा. 

यासोबतच कार्बोहायड्रेट्स मिळवण्यासाठी दलिया किंवा रव्यापासून बनवलेले पदार्थ म्हणजेच उपमा, अप्पम यांचा समावेश अधिक करा. इडली सांबार हा सकाळच्या नाश्त्याला एक उत्तम आणि परिपूर्ण पर्याय आहे. 

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?