वजन कमी करण्यासाठी ‘ही’ फळे खा

Health Tips : वजन कमी करण्यासाठी ‘ही’ फळे खा

वाढलेले वजन कमी करणे हे एक आव्हान असते. चुकीचा आहार, अपुरी झोप आणि ऑफिसमध्ये एकाच जागेवर बसून काम, व्यायामाचा अभाव यांमुळे लठ्ठपणा कमी होण्याचे नावच घेत नाही. लठ्ठपणामुळे मग उच्च रक्तदाब, मधुमेह आणि आरोग्याच्या इतर समस्याही उद्भवतात. मात्र असे होऊ नये म्हणून इतर गोष्टींबरोबर आहाराविषयी जागरुक असणे आवश्यक आहे. फळे खाणे आरोग्यदायी असते हे आपल्याला माहित आहे. म्हणून कधी आवडीने तर कधी आवडत नसली तरीही आरोग्य उत्तम रहावे यासाठी आपल्यातील अनेक जण फळे खातात. पण काही ठराविक फळे ठराविक वेळात खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

कलिंगड
कलिंगडामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात तसेच या फळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कलिंगड खाण्याने शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

पेर
पेर या फळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे हे फळ खाल्ल्यावर दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. पेर खाल्ल्याने भूक कमी लागण्यास मदत होते आणि त्यामुळे नकळत वजन कमी होते. तसेच शरीरातील नको असलेले कोलेस्टेरॉल शरीराबाहेर टाकण्यासाठीही पेर उपयुक्त फळ आहे. पण हे फळ सालासकट खाल्ल्यास जास्त फायदेशीर ठरते.

पेरु
पेरुमध्येही फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास हे फळ उत्तम उपाय ठरु शकते. याबरोबरच पेरुमध्ये कॅल्शियम आणि व्हीटॅमिन्सचे प्रमाणही जास्त असते. शरीरावरील जास्तीची चरबी जळण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.

सफरचंद
‘अॅन अॅपल अ डे कीप डॉक्टर अवे’ अशी म्हण आपण कायमच ऐकतो. सफरचंद खाणे आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे असते. मध्यम आकाराच्या सफरचंदामध्ये जवळपास ७२ कॅलरीज असतात. सफरचंदामध्येही जास्त प्रमाणात फायबर असल्याने दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. तसेच सफरचंद खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासही मदत होते. त्यामुळे सहाजिकच वजन कमी होते.

🖋✒ संकलन:- स्वप्निल आव्हाड.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?