तुमची विकेट सांभाळा…!

तुमची विकेट सांभाळा…!

            तुमचा कुठलाही आवडता क्रिकेटर मग तो सचिन असो किंवा विराट, 99 रन काढून शंभरी ठोकणारच असतो परंतु, एक चुकीचा शॉट खेळून विकेट देऊन बसतो. किती वाईट वाटत ना? आपल्यालाही आणि खेळाडूलाही! विकेट पडल्यानंतर खेळाडूचे आपण नक्कीच निरीक्षण केले असेल, हो ना? कोणता भाव असतो हो त्याच्या चेहऱ्यावर, माहिती आहे? पश्चाताप... एक चुकीचा शॉट मारल्याचा...

            होय पश्चाताप, आयुष्यात सगळ्यात जास्त त्रास कुठल्या गोष्टीचा होत असेल तर पश्चातापाचा. हि भावनाच इतकी वेदनादायी असते कि, केलेल्या चुकीचा त्रास भोगण्याशिवाय आपल्या हातात काहीच पर्याय नसतो. बाण सुटलेला असतो आणि आपण असतो फक्त प्रेक्षक!

            काश मी त्या दिवशी गाडी हळू चालवली असती, काश मी अभ्यास केला असता, काश मी कुणाचा तरी सल्ला घेतला असता, काश मी व्यसनांच्या आहारी नसतो गेलो, काश मी चुकीच्या नात्यात अडकलो नसतो, काश मी तो गुन्हा केला नसता, काश मी तो मोह आवरला असता, काश मी तसं बोललो नसतो, काश मी विचार करून शब्द दिला असता, काश मी आरोग्याची काळजी घेतली असती, काश मी ती रिस्क घेतली नसती, काश मी काळजी घेतली असती, काश, काश आणि काश... विचार करून मनाच्या चिंध्या होतात, मन पोखरून निघतं, पण वेळ निघून गेलेली असते.

लेखन : स्वप्निल आव्हाड,  (शिवाजीनगर) माळवाडी, सिन्नर.

            पश्चातापाचं विष मनाच्या नसानसात भिनतं आणि आयुष्य नकोस करून जातं. त्यामुळे काळजी घ्या.  आयुष्य खूप अनमोल आहे. तुमची विकेट सांभाळा, खासकरून जेव्हा तुम्ही चांगलं खेळत असाल. तुमची विकेट घ्यायला खूप सारे टपून असतात. सतर्क रहा, चुका टाळा, हुशारीने वागा, प्रत्येक पाऊल विचार करून टाका, फायद्या-तोट्याचा विचार करा, मोहाला बळी पडू नका, पाया जवळचा विचार करण्यापेक्षा दूरचा विचार करा, आरोग्य सांभाळा, दुसऱ्यांच्या चुकांतून शिका, स्वतःला वेळ द्या, चांगल्या सवयी लावा,  मग बघा आयुष्यातील क्रिकेटमध्ये तुम्ही शतकचं काय डबल शतकही नक्कीच ठोकाल...! 

ज्यांच्याबद्दल तुम्हाला काळजी वाटते त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्कीच शेअर करा

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?