बाबासाहेबांचे अनमोल विचार आजच्या काळातही लागू

बाबासाहेबांचे अनमोल विचार आजच्या काळातही लागू

बाबासाहेबांचे संदेश स्वातंत्र्यकाळात जेवढे उपयोगी होते, तेवढेच तंतोतंत आजच्या काळातही लागू होतात.

भारतीय संविधानाचे शिल्पकार असलेल्या भारतरत्न डॉ. भीमराव रावजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये मध्य प्रदेशमध्ये झाला. बाबासाहेब या नावानेच ते जनसामान्यात प्रचलित झाले.

भारतीय संविधानाचे शिल्पकार अशी त्यांची जगात ओळख आहे. संविधान वाचून त्यांची दूरदृष्टी आणि व्यापकता याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

बाबासाहेबांचा जन्म हिंदू धर्माच्या महार जातीमध्ये झाला. तेव्हा जाती व्यवस्थेचा पगडा समाजावर होता. पण आता २१ व्या शतकात परिस्थीती अचानक बदलली असे नाही. आजही गरीबी, जाती व्यवस्था मधूनच डोके वर काढत असते.

हीच गरीबी हटविण्यासाठी बाबासाहेब शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिले. त्यांनी दिलेले संदेश स्वातंत्र्यकाळात जेवढे उपयोगी होते, तेवढेच तंतोतंत आजच्या काळातही लागू होतात.

१) मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव शिकवतो.

२) आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.

३) एक महान व्यक्ती एका प्रतिष्ठित व्यक्तीपासून वेगळा असतो, कारण तो समाजाचा सेवक बनण्यास तयार असतो.

४) मनाचा विकास मानव अस्तित्वाचे परम लक्ष्य असावे.

५) आम्ही सर्व प्रथम आणि अंतिमही भारतीय आहेत

७) मनुष्याच्या विचाराला प्रचार-प्रसाराची गरज असते. जसे की एका रोपट्याला पाण्याची गरज असते. नाहीतर दोघेही कोमेजून आणि मरून जातील.

८)  मी एका समुदायाच्या प्रगतीचे मोजमाप महिलांच्या मिळवलेल्या प्रगतीतून करतो.

९) जिथे नैतिकता आणि अर्थशास्त्र यामध्ये संघर्ष होतो तिथे अर्थशास्त्राचा विजय होतो.

१०)  प्रत्येक व्यक्ती जो "MILL" चा सिद्धांत जाणतो, एका देशाने दुसऱ्या देशावर राज्य करणे योग्य नाही, त्यांनी हेदेखील स्वीकार करावे की एका वर्गाला दुसऱ्या वर्गावर राज्य करता येणार नाही.

११) आपल्या भाग्यापेक्षा आपल्या ताकदीवर विश्वास ठेवा.

१२) जर मला वाटले सविंधानचा दुरुपयोग होतोय तर संविधान जाळणारा पहिला मी असेन.

१३) जोपर्यंत तुम्हाला सामाजिक स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत कायद्याचे स्वातंत्र्य ही बेमानी ठरते.

______________________________
कसा असावा उद्योजक...

👉 उद्योजकाने महत्त्वाकांक्षी असायला पाहिजे, मोठेपणा मिळवणं, महत्त्व मिळवणं याची इच्छा मनात बाळगली पाहिजे.

👉  सतत पुढे जाण्याची वृत्ती असावी. आशावादी राहिलं पाहिजे तरच व्यवसायात येणाऱ्या छोट्या-मोठ्या प्रश्नां ना उत्तरं देता येतात.

👉  आपल्या व्यवसायात आपल्याला नेमकं काय करायचंय याविषयी ठाम असलं पाहिजे. धरसोड करू नये. काय करायचंय हे पक्कं ठरवलं की या दृष्टीने वाटचाल केली जाते.

👉  नवे शिकण्याची सतत उत्सुकता असली पाहिजे. तरच व्यवसायात पुढे जाण्यासाठी संधी प्राप्त होतील.

👉  आपण जो कुठलाही व्यवसाय निवडला असेल तो नाइलाजाने नाही तर आनंदाने केला पाहिजे. कारण काहीवेळा

👉  आर्थिक उत्पन्न कमी होते, व्यवसायात समस्या येतात. परंतु, जर मनोवृत्ती चांगली ठेवली तर प्रश्न  सोडवण्याचे मार्ग सापडतात.
उद्योजक स्वतः जर उत्साही असेल तर तो इतरांना कामासाठी प्रेरणा व उत्साह देऊ शकतो. उत्साही व्यक्तीा कार्यप्रवणही असते.

👉  बोलताना सौम्यपणे बोलणे, नेमके बोलणे, आत्मविश्वाासाने बोलणे आवश्य्क आहे, अशा बोलण्याचे इम्प्रेशन अधिक पडते.
राहणी नीटनेटकी असली पाहिजे. जरी या बाबीला खूपसे महत्त्व नसले तरीही काही प्रमाणात याचा विचार केला जातो.

👉  कामाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करून तयार केलेल्या वेळापत्रकानुसार कामे पार पाडली पाहिजेत. व्यवस्थापन कौशल्ये आत्मसात केली पाहिजे.

👉  उद्योग व्यवसायासाठी अनेकांची वेगवेगळ्या कारणांसाठी मदत लागते. उदा. वितरक, कच्चा माल पुरविणारे, जाहिरातदार, वार्ताहर यासाठी लोकसंपर्क व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे.

👉  बाजारपेठेत नवीन काय आहे, सध्या कुठले ट्रेंडस चालू आहेत याविषयीची अद्ययावत माहिती असणे आवश्यपक आहे.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?