Smile Katta ЁЯШЖЁЯШЖЁЯШВЁЯШГ
👉 Smile Katta
😊 बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते.
नवरा : काय सांगतेस. तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?
बायको : हो...
नवरा : अरे देवा आणि मी त्या माऊलीला आतापर्यंत वाईट समजत होतो.
-----------------------------------------------------------
मुलगा : बाबा मला परीक्षेमध्ये 90% भेटले तर तुम्ही काय कराल?
.
.
वडिल : मी आनंदाने वेडा होईन...!
.
.
मुलगा : हिच भीती होती म्हणून नापास झालो. तुम्ही वेडे झालात तर आम्हाला कोण संभाळणार...!
-----------------------------------------------------------
😊 नवरा : अगं कुठे चाललीस तू?
बायको : दिसत नाही काय? आंघोळीला चाललीय ते!
नवरा : अग पण मोबाईल घेऊन?
बायको : मग, बादली भरेपर्यंत काय करू?
-----------------------------------------------------------
😊 बायकोने आपल्या पतीचे पाय का चेपावेत?
या पाठीमागे ग्रहयोगाचे कारण सुध्दा आहे.
पुरूषाच्या गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा भाग शनीचा असतो व बायकांच्या मनगटापासून बोटांपर्यंत भाग शुक्र ग्रहाचा असतो .
जेव्हा शनीवर शुक्राचा प्रभाव पडतो त्यावेळी धन प्राप्तीचा योग जुळून येतो म्हणून बायकोने पतीचे पाय दररोज दाबावेत असे शास्त्रात सांगितले आहे.
हा मेसेज पाठवणारा भाऊ 3 महीन्यापासून हॉस्पिटलमध्ये भरती आहे. त्याची हाडे फ्रॅक्चर आहे...!
-----------------------------------------------------------
😊 लोग कहते हैं कि,
मां बाप के कर्मों का फल संतान को भुगतना पड़ता है,
लेकिन
.
.
.
.
.
कभी-कभी इसका फल दामाद को भी भुगतना पड़ता है।
-----------------------------------------------------------
😊 जीवन खुप "सुंदर" आहे फक्त...
सासरा : तहसिलदार पाहिजे
सासु : मंडळ अधिकारी पाहिजे
बायको : तलाठी पाहिजे
मेव्हणा : PSI पाहिजे
अन्
आपला वाळूचा ट्रक पाहिजे!
-----------------------------------------------------------
😊 समस्त स्त्री जातीला पडलेला एक गहन प्रश्न
.
.
.
.
पुरुष तर कधीच उपवास करत नाहीत तरीही त्यांना आपल्या सारख्या चांगल्या बायका कशा मिळतात?
-----------------------------------------------------------
😊 बाबा : आजपर्यंत तु असं काही काम केलंस का ज्याने माझी मान वर होईल?
मुलगा : एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती, विसरले का लगेच?
-----------------------------------------------------------
😊 बायकांची प्रार्थना...
हे देवा माझ्या नवऱ्याला पैसा, धन, दौलत, यश सारं दे... माझ्यासाठी काही नको!
.
.
.
.
.
.
.
त्याच्याकडुन कसं घ्यायचं ते मी बघते...!
-----------------------------------------------------------
😊 आजच हास्य टॉनिक
एक बाई हॉटेल मध्ये एकटीच गेली. हॉटेल फूल होते. वेटर बोलला अर्धा तास लागेल तिच्याकडे तितका वेळ नव्हता. अनेक जोडपी बसली होती. हिला एकटी असल्याने जागा मिळत नव्हती. तिने फोन फिरवला आणि जोरात म्हणाली,
अगं तुझा नवरा कुणा मैत्रिणी बरोबर बसलाय. ये आणि बघ. 5 मिनिटात 10 जोडपी गायब झाली.
-----------------------------------------------------------
Comments
Post a Comment