तुम्हाला इतरांपेक्षा जास्त डास चावतात का..??

👉 तुम्हाला इतरांपेक्षा जास्त डास चावतात का..??

तुम्हाला इतरांपेक्षा जास्त डास चावतात का? तसं असेल तर मग तुम्हालाच जास्त डास का चावतात याचं उत्तर शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे. तुम्हाला जास्त डास चावत असतील तर याला काही शारीरिक कारणं देखील असू शकतात. एका संशोधनातुन डासांना कोणत्या गोष्टी आकर्षित करतात याचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.

👉 ब्लडग्रुप O असल्यास अशा व्यक्तींकडे डास अधिक आकर्षित होतात. त्यानंतर A ब्लडग्रुप, B रक्तगट आणि AB ब्लडग्रुपच्या व्यक्तींकडे डास आकर्षित होतात.

👉 डास कार्बन डायऑक्साइडकडे जास्त आकर्षित होतात. मुलांच्या तुलनेत मोठी माणसं कार्बन डायऑक्साईड जास्त सोडतात. त्यामुळे मुलांच्या तुलनेत मोठ्या माणसांना डास जास्त चावतात.

👉 शरीरातील काही विशिष्ट जनुके डासांना आकर्षित करतात. ज्या व्यक्तींच्या शरीरात अशी जनुके असतात त्यांना डास अधिक चावतात.

👉 घामात असलेल्या लॅक्टीक अॅसिड, युरीक अॅसिड, अमोनिया यांचा गंध डासांना दुरूनच येतो. त्यामुळे अशा व्यक्तींकडे डास जास्त आकर्षित होतात आणि त्यांना चावतात.

👉 बिअर प्यायल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरातून इथेनॉलचा गंध येतो. त्यामुळे डास त्या व्यक्तीकडे आकर्षित होतात आणि त्यांना चावतात.

👉 काही अभ्यासानुसार गोऱ्या रंगापेक्षा सावळ्या रंग असणाऱ्याला डास जास्त चावतात असा निष्कर्ष आला आहे.

👉 लाल, निळ्या, काळ्या व जांभळ्या कलरसारखे डार्क रंग डासांना लवकर ओळखता येतात, यामुळे डार्क रंगाचे कपडे घालणाऱ्या व्यक्तींना जास्त डास चावतात.

👉 डास चावणे हे आपल्या अनुवांशिकतेवर सुद्धा अवलंबून असते. जर तुमच्या घरातील व्यक्तींना जास्त डास चावत असतील तर तुम्हाला देखील जास्त डास चावतील.

👉 स्किनमधील बॅक्टेरिया डासांना आकर्षित करतात. तर काही स्किनमधील बॅक्टेरिया डासांना दूर पळवतात. म्हणून स्किननुसार सुद्धा डास चावतात.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?