Smile Katta

👉 Smile Katta

😊 नवऱ्याने बायकोच्या मोबाइलमध्ये ब्लु व्हेल डाउनलोड करून दिला...


आणि ब्लु व्हेल मेला...!

-----------------------------------------------------------

😊 पत्नी : I love u. I can’t live without you! मर जाऊंगी..! मिट जाऊंगी..! जहर पी जाऊंगी तेरे प्यार मे फना हो जाऊंगी..!

पती : बघ तुला कसं जमतंय तसं कर...!

-----------------------------------------------------------

😊 पुणेकर : उंदिर मारायचे औषध द्या.

दुकानदार : घरी न्यायचंय का?


पुणेकर : नाही... उंदिर आणलाय सोबत. इथेच भरवतो.

-----------------------------------------------------------

😊 इस से अच्छे दिन और क्या आएंगे?

लोग सज-धज के सह-परिवार " टॉयलेट " जा रहे है।

-----------------------------------------------------------

😊 कधी रडत असतो, ते कोणाला दिसत नाही…
कधी काळजीत असतो, ते कोणाला दिसत नाही…
कधी आनंदी असतो, तेही कोणाला दिसत नाही…
.
.
.
.
.
पण कधीतरी वडापाव खाताना दिसलो की लगेच येतील. काय भावा, एकटा-एकटा!

-----------------------------------------------------------

😊 यशस्वी व्हायचा सगळ्यात सोपा उपाय.

एका हातात "लोणी " आणि  दुसऱ्या हातात "चुना" घ्या.

(दोन्हीही एक सारखेच दिसतात.)

फक्त आणि फक्त...

समोरच्या माणसाची वेळ पाहून लावायला शिका.

बस्स, तुम्ही जीवनात यशस्वी झालेच म्हणून समजा.

-----------------------------------------------------------

😊 प्रियकराच्या मृत्यूनंतर त्याची प्रेयसी त्याच्या चितेवर झोपली हि घटना पाहिल्यावर लोकांना अश्रू अनावर झाले, पण घडले ते विचित्रच??
.
.
.
.
तिने सेल्फी काढली आणि पोस्ट टाकली. "Me With My Ex-Boyfriend" At स्मशान घाट - Feeling Sad...!!! With Panditji & 14 Others

नुसता राढा लई रडारडी...!

-----------------------------------------------------------

😊 मुसळधार पाउस चालू होता आणि त्या पावसात एक तरुण भिजत रस्त्याने चालला होता. तेवढ्यात एक सुंदर तरुणी त्याच्या बाजूने छत्री घेउन आली आणि त्या तरुणाला म्हणाली "तू माझ्या छत्री मधे येउ शकतोस
मला काहीच अडचण नाही." यावर तो तरुण म्हणाला "नको ताई, राहु दे.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तात्पर्य : यात तात्पर्य बित्पर्य काही नाही. मागुन बायको येत होती.

-----------------------------------------------------------

पक्या : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना आणि आज एकदम मूडमध्ये?

मन्या : काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत...

पक्या : मग आज मूड ऑन कसा?

मन्या : आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय...

-----------------------------------------------------------

😊 मनावर घेऊ नका फक्त हसा...

एक जोडपं 25 वर्षात कधीच भांडलं नाही! एका मित्रानं विचारलं : तुला हे कस काय शक्य झालं ??

नवरा : आम्ही नवीन नवीन लग्न झाले त्यावेळेस शिमल्याला हनिमूनला गेलो होतो.  तिथे घोडेस्वारी करताना माझी बायको  ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने उडी मारुन बायकोला खाली पाडली.

ती उठली व परत घोड्यावर बसली अन त्याला म्हणाली "हे तुझ पहिल्यांदा झालं", थोड्या वेळाने पुन्हा तेच घडलं. ती परत बोलली "  हे तुझ दुस-यांदा  झालं"

आणि जेव्हा तेच तिसऱ्यांदा घडलं तेव्हा तिने सरळ त्या घोड्याला दरीत ढकलून दिलं.

मी ओरडलो, " ए बावळट, !  तू घोड्याला मारलंस ? पागल! "

तेव्हा ती मला रागात बोलली "हे तुझ पहिल्यांदा झालं"आणि तेव्हापासुन भांडण तर दूरच. साधा वाद पण नाय केला कधी. आम्ही अगदी आनंदी संसार करतो.

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.