प्रेम फुलवण्यासाठी 'या' गोष्टी टाळा...

👉 प्रेम फुलवण्यासाठी 'या' गोष्टी टाळा...

नाते जोडणे खूप सोपे असते, पण ते टिकवणे तेवढेच कठीण असते. नाते उत्तमरीत्या टिकवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण यावरच कोणत्याही नात्याचा पाया रचलेला असतो. कोणत्या आहेत या गोष्टी यावर एक नजर...

👉 आग्रह टाळा : सतत आपल्या जोडीदाराच्या सवयींमध्ये किंवा त्याच्या स्वभावामध्ये चुका काढणे, त्याला कमी लेखणे टाळायला हवे. आपल्या जोडीदाराने आपण म्हणतो तसेच राहायला हवे किंवा वागायला हवे हा आग्रह टाळायला हवा.

👉 स्वातंत्र द्या : आपल्या जोडीदाराचे स्वतंत्र व्यक्तिमत्व असून त्याचीही अनेक बाबतीत आपल्यापेक्षा निराळी मते असू शकतात हे समजून घ्या. जर दोघेही आपले विचार एकमेकांवर सतत लादत राहिले, तर त्या विचारांचे ओझे वाटायला लागते.

👉 टिंगल टाळा : चारचौघांमध्ये आपल्या जोडीदाराची कोणत्याही कारणाने टिंगल करणे टाळा. असे करून तुम्ही इतरांनाही आपल्या जोडीदाराची टिंगल करण्यास प्रवृत्त करीत असता.

👉 सल्ले टाळा : आपला जोडीदार करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सल्ले देणे टाळा. त्याने काय खावे, काय प्यावे, कोणते कपडे घालावेत, किती पैसे कसे खर्च करावेत या बाबतीतले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या दोन्ही लोकांना असले पाहिजे.

👉 समोरच्याचा विचार करा : प्रत्येक वेळी आपल्या जोडीदाराला बरे वाटावे म्हणून त्याच्या मनाप्रमाणे वागत राहणे आणि आपण सतत त्याग करतो आहोत हे दाखवून देणे ही रिलेशनशिप तुटण्यामागचे कारण आहे. त्यामुळे नात्यामध्ये दोघांच्याही मतांचा, इच्छांचा बरोबरीने विचार व्हायला हवा.

👉 दोष देणे टाळा : एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली नाही की त्याचा दोष आपल्या जोडीदाराला देण्याकडे काहींचा कल असतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली नसली, तरी त्यामागील कारणांचा शांतपणे विचार करा.

👉 तुलना करू नका : आपल्या जोडीदाराची, इतरांच्या जोडीदारांशी तुलना करणे आवर्जून टाळा. रंगरूप, आर्थिक प्राप्ती, वागण्या-बोलण्याच्या सवयी, शिक्षण या बाबतीत आपल्या जोडीदाराची इतरांशी तुलना करून त्याला कमी लेखू नका.

👉 संभाषण साधा : सर्व बाबतीत आपल्या जोडीदाराशी संभाषणाचा मार्ग नेहमी मोकळा ठेवा. रिलेशनशिपमध्ये मतभेद होतात, वाद ही होतात. पण अशी कोणतीही अडचण नाही ज्यातून संभाषणाद्वारे मार्ग निघत नाही. त्यामुळे एकमेकांशी संभाषण साधा.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?