बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या वाटा

💁‍♂ *बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या वाटा*


🎯 आयुष्यात बारावीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांच्या करिअरचा टर्निग पॉईंटसाठी हा काळ महत्वाचा असतो. यामुळे बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या काही वाटा आपण पाहू....

▪ *आर्टीस्ट* : तुम्हीजर क्रियेटीव्ह नेचरचे असाल, कोणताही गोष्ट वेगळ्या पद्धतीने सादर करण्याची कला तुमच्यामध्ये असले तर, समजून जा तुम्ही एक कलाकार आहात. त्याचा प्रत्यक्ष जीवनात करिअर म्हणून वापर करता येऊ शकतो. म्हणून, कलेशी संबंधित कोणताही कोर्स तुम्ही करू शकता. हे कोर्सेस विविध संस्थांमध्ये 6 महिने ते 2 वर्षे किंवा त्याहूनही अधिक कालावधीसाठी शिकवले जातात.

▪ *हॉटेल मॅनेजमेंट* : हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला 12वी पास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, सेल्फ कॉन्फडन्स आणि कम्यूनिकेशन स्किल याच्या आधारावर तुम्ही यशस्वी उद्योजक बनू शकता. हा कोर्स सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि बॅचलर डिग्री अशा स्वरूपात उपलब्ध आहे. हा कोर्स केल्यावर तुम्ही जॉब करू शकता तसेच, स्वत:चा व्यवसायही करू शकता.

▪ *आर्कीटेक्चर* : तुम्ही जर सायन्समधून 12वी पास असाल तर, त्यातही तुमचा जर गणित विषय असेल तर, तुम्ही आर्कीटेक्चर फिल्डसाठी ट्राय करू शकता. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला एण्ट्रन्स एग्झाम द्यावी लागते. या कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वी तूम्ही जर, तुमचा पोर्टफोलियो डिझाईन केला असेल किंवा एखादा प्रोजेक्ट केला असेल तर तुमची प्रवेश निश्चितीची शक्यता अधिक वाढते.

▪ *मर्चंट नेव्ही* : मर्चंट नेव्हीत प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 60% गुणांनी 12वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सोबतच तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडवाले (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) असणे गरजेचे आहे. एन्ट्रान्स एग्झाम पास झाल्यावर तुम्हीला या कोर्ससाठी अप्लाय करता येऊ शकते.

▪ *टेक्निकल फिल्ड* : आपल्यापैकी अनेक लोकांना यंत्राबाबत जाणून घेण्याची इच्छा आणि आवड असते. कोणतेही यंत्र हातात पडले की, ते खोलने, जोडणे त्यातून नवे काही निर्माण करणे असे प्रकार अशा लोकांकडून होता. अशा मंडळींसाठी 12 नंतर टेक्निकल फिल्ड केव्हाही चांगले. आपण टेक्निकल फिल्डचे ट्रेनिंग करून या क्षेत्रात करिअर करू शकता.

▪ *इतर कोर्सेस* : याशिवाय आपण डिप्लोमा इन फिल्म, एनिमेशन, कॅमेरा आणि लाईटींग, डिप्लोमा इन फिल्म मेकींग आणि व्हिडिओ प्रॉडक्शन यातही प्रयत्न करू शकता. हे सर्व कोर्सेस तुम्हाला 6 महिने ते 2 वर्षे कालावधीत पूर्ण करता येतात.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?