सतत निराश आणि अस्वस्थ वाटतंय? हे उपाय करुन पाहा

सतत निराश आणि अस्वस्थ वाटतंय? हे उपाय करुन पाहा

कधी एखाद्या गोष्टीत अपयश आलं म्हणून तर कधी आपल्या मनाप्रमाणे घटना घडत नाहीत म्हणून आपण अस्वस्थ असतो. दिर्घकाळ अस्वस्थता कायम राहीली की निराशा येते. यामुळे आपण आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या घटनांचाही आनंद चांगल्या पद्धतीने घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत भिती वाटणे, चिडचिड होणे, अस्वस्थ होणे असे परिणाम दिसून येतात. मात्र यावर वेळीच काही उपाय केल्यास या परिस्थितीतून बाहेर येणे शक्य होते. त्यामुळे सुरुवातीला अशा परिस्थितीत आपल्याला शक्य तितके घरगुती उपाय करावेत नाहीतर डॉक्टरांचा सल्ला घेणे हा उपाय असतोच. पण हे घरगुती उपाय नेमके कोणते असावेत याविषयी…

१. आपण निराश झालोय, ताण आलाय किंवा अस्वस्थ झालोय हे वेळीच मान्य करा. ते मान्य न करता काम करत राहील्यास हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता असते.

२. बराच वेळ असे होत असल्यास तुम्हाला शांतता आणि आरामाची गरज आहे हे लक्षात घ्या. ही शांतता मिळवण्यासाठी योग्य ती काळजी घ्या. कारण डोक्यात अनेक गोष्टींचे वादळ सुरु असले की अस्वस्थता आणि नैराश्य येण्याची शक्यता जास्त असते.

३. आपल्याला आलेली अस्वस्थता कशामुळे आहे, याचे कारण आपल्याला अनेकदा समजत नसते. हे कारण शोधणे आणि ते काही तरी फुटकळ आहे की गंभीर हे तपासून पहायला हवे. यासाठी स्वत: स्वत:शी संवाद साधणे आवश्यक आहे.

४. ताण घालविण्यासाठी फिरायला, चालायला जाणे. गाणी ऐकणे, वाचन करणे. चित्रपट पाहणे अशा गोष्टी केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.

५. हे सगळे करण्याचा कंटाळा आला असेल तर काहीतरी गंमतीशीर वाचा. मोबाइलमधले फनी व्हीडीओज पाहा. त्यामुळे तुमचा मूड फ्रेश होण्यास नक्कीच मदत होईल आणि नैराश्य दूर होऊ शकेल.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?