आयुष्यात खुप काही म्हणजे नक्की करायचं माहिती आहे का?

👉 आयुष्यात खुप काही म्हणजे नक्की करायचं माहिती आहे का?

प्रभावशाली व्यक्तिंकडे किंवा त्यांच्या जीवनाकडे डोकावले तरी आपल्या सारख्यांना एक वेगळेच स्फुरण चढते. मग आपल्या जीवनात काही तरी करायचं ही अभिलाषा जन्म घेते. मग आपलं ठरतं आयुष्यात आपल्याला खूप काही करायचंय? पण नेमकं काय करायचं? कुठून सुरूवात करायची? आणि ते कसं करायचं हेच नक्की होत नाही लवकर. वेळ हळू-हळू जात असतो. मग असं वाटायला लागतं खूप लेट झालंय. आपला फोकस बदलायला लागतो आणि मग आपण आहे त्यात धन्यता मानायला लागतो. मात्र असं होऊ नये म्हणून काय करायचं? ते पाहूयात...

1) एक लक्षात घ्या, तुमची स्पर्धा दुसऱ्या कोणाशी नाही तर स्वतःशी आहे. असं खास काहीतरी करा की, ते उत्तमच असलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे जे केलं ते केलं, त्याहून काहीतरी खास करण्याची तयारी करा.

2) समस्या सोडवताना अंग काढून घ्यायचा प्रयत्न करू नका अन्यथा ती समस्या एक नवीन प्रॉब्लेम निर्माण करते. त्यामुळे सतत तक्रार करणं सोडा, जे समोर येईल त्याला भीडा. झोकून देऊन काम करा.

3) जेमतेम आणि नेमून दिलेलं काम तर सगळेच करतात. लोकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काहीतरी करण्याची करण्याची तयारी ठेवा.

4) वारा आला की फिरवली पाठ अशी वृत्ती काय कामाची. तुम्ही जे काही कराल त्यावर निष्ठा ठेवा आणि ठाम रहा.

5) तुमचं लक्ष्य काय? तुम्हाला नक्की काय हवंय? हे विसरू नका. काहीही झालं तरी, तुमचा फोकस हलता कामा नये.

6) नेता चांगला असतो, पण त्याचे सल्लागार वाईट असतात. हे वाक्य आपण सतत ऐकतो. तसं आपलं होऊ नये, म्हणून मित्र चांगले आणि जपून निवडा. चांगली यशस्वी माणसं पहा आणि त्यांचे मित्र पहा, संगतीचा असर होतोच.

7) अनेकदा असतं सगळं पण आपला स्वतःवरच भरवसा नसतो. त्यामुळे जरा स्वतःवर भरवसा ठेवून, स्वतःवरही प्रेम करा. म्हणजे जे हवंय ते मिळेल.

8) अनेकदा काही माणसांविषयी आपल्याला वाटतं भलतंच, पण ती असतात वेगळीच. त्यामुळे आपलं रेप्युटेशन काय तयार होतेय. याकडे जरा लक्ष द्या. एकदा प्रतिमा डागाळली तर ती सुधारायला प्रचंड कष्ट पडतात.

9) स्वतःला एकदा विचारा, आपण कशासाठी जगतोय? आपलं ध्येय काय? जगणं खूप सुंदर आहे, ते नाकारू नका. असं म्हणतात ना की, काहीतरी करून अपयश मिळवणं हे काहीच न करण्यापेक्षा केव्हाही चांगलंच.

10) उठलं की फोन… असं होतं का तुमचं? त्यापेक्षा दिवसाची सुरूवात आनंदी होईल, असा प्रयत्न करा. अनेदका छोट्या गोष्टीनं मूड जातो आणि चिडचिड होते. त्यामुळे उठल्या क्षणापासून स्वतःला पॉझिटिव्ह एनर्जीचा एक डोस द्या.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?