काय तुम्ही पण हे पदार्थ जास्त प्रमाणात खाता ..?

काय तुम्ही पण हे पदार्थ जास्त प्रमाणात खाता ..?

तुम्हाला हे माहीत आहे का, की काही सामान्य पदार्थ चुकीच्या पद्धतीनं खाणं आपल्या जीवावर बेतू शकतं. पाहूया कोणते आहेत ते पदार्थ...

🍄 जायफळ
जायफळजायफळचं अतिप्रमाणात सेवन केल्यास तुम्हाला निरनिराळे भ्रम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उलटी, डोकेदुखी तसेच अस्वस्थता किंवा घाबरल्यासारखं होऊ शकतं.

🍄 शेंगदाणे
जास्त शेंगदाणे खाल्याने श्वास घ्यायला अडचण येऊ शकते. त्याचबरोबर चक्करसूद्धा येते. इतकेच नव्हे तर जास्त शेंगदाणे खाल्याने त्याचा श्वासावर परिणाम होऊ शकतो. शिवाय श्वासात अडथळे निर्माण होऊन मृत्यू येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

🍄 मध
निर्जंतुकीकरण केलेल्या मधामध्ये विषारी टॉक्सिन्स असतात. असे मध खाल्याने अशक्तपणा, उलटी, डोकेदुखीसारखे आजार मागे लागू शकतात.

🍄  राजमा
लाल रंगाच्या राजमामध्ये लेक्टिन्स असतात, यामुळे पोटातील सेल्स नष्ट होण्यास सुरुवात होते. राजमा खाण्याआधी कमीत कमी १० मिनिटे उकळून घ्या.

🍄 फळांच्या बिया
सफरचंदाच्या बियांमध्ये सायनाइड निर्माण करणारे काही गुण असतात. या बियांचं जास्त सेवन केल्यास चक्कर येणे, उलटी येणे, रक्तदाब,किडनीच्या समस्या, कोमामध्ये जाणे इतकचं नाही तर मृत्यूही होऊ शकतो.

🍄 टॉमेटोची पानं
टॉमेटोच्या पानांमध्ये विषारी पदार्थ असतात. ही पानं अतिप्रमाणात खाल्याने पोटदुखी, अस्वस्थता असे रोग होण्याची शक्यता असते.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?