संजीवनी वनस्पती सापडली..?

👉 संजीवनी वनस्पती सापडली..?

भारतीय संशोधकांना लडाखच्या अतिउंच हिमालय शिखरांवर 'वंडर हर्ब' म्हणता येईल अशी वनस्पती सापडली आहे. रामायणात लक्ष्मणाला जीवनदान देणारी संजीवनी वनस्पती हीच असावी असा तर्कही व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक भाषेत या वनस्पतीचे नांव सोलो आहे तर तिचे शास्त्रीय नांव व्हिडीओला आहे.

गेली 10 वर्षे या वनस्पतीवर डिफेन्स इन्स्टिीट्यूट हाय अल्टीट्यूड रिसर्च सेंटरमध्ये संशोधन सुरू आहे. ही वनस्पती प्रतिकार शक्ती वाढविणारी, पर्वतीय उंचावरील हवामान सहन करण्याची शक्ती देणारी आणि रेडिओ अॅक्टीव्हीटीपासून संरक्षण करणारी आहे. तिचे इतरही बरेच गुणधर्म असावेत असा अंदाज करण्यात आला आहे.

लडाख भागात या वनस्पतीच्या पानांचा वापर भाजी म्हणून केला जातो. संशोधनात भूक वाढविणारी, अँटी डिप्रेसंट तसेच जैवरासायनिक बॉम्बमधून बाहेर पडणाऱ्या गॅमा किरणांच्या रेडिएशनपासून संरक्षण करणारी असेही तिचे काही गुणधर्म सापडले आहेत. ही वनस्पती सियाचीनसारख्या अति दुर्गम भागात काम करणाऱ्या सैनिकांसाठी संजीवनी ठरू शकेल असा विश्वास संशोधकांना आहे.

ही वनस्पती चीन तसेच यूएस मध्येही आढळते. चिनी पारंपारिक औषधात ती दीर्घकाळ वापरली जात आहे. मंगोलियात तिचा वापर कॅन्सर आणि क्षय रोगावर देखील केला जातो. यापूर्वी रशियात अंतराळवीरांसाठी तिचा वापर केला गेला आहे. वृद्धत्व दूर ठेवण्यासाठीही ती उपयुक्त आहे. सध्या लडाखमधील संरक्षण प्रयोगशाळेत दोन एकरांवर तिची लागवड करण्यात आली आहे. ही लागवड अन्य ठिकाणी करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?