आयुष्य एक खेळ...!

👉 आयुष्य एक खेळ...!

कल्पना करा, आयुष्य एक खेळ आहे. यामध्ये तुम्हाला 5 चेंडूसह खेळायचे आहे. मात्र हे चेंडू खाली पडू न देता तुम्हाला हवेत उडवायचे आहेत. ते चेंडू म्हणजे, ’काम’, ’कुटूंब’, ’आरोग्य’, ’मित्र’ आणि ’मन’.

हे सगळं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, यातील ’काम’ हे एखाद्या रबर बॉलप्रमाणे आहे. जर चेंडू हवेतून खाली पडला तर पुन्हा परत येईल. मात्र उरलेले चार चेंडू ’कुटूंब’, ’आरोग्य’, ’मित्र’ आणि ’ मन’ एखाद्या काचेप्रमाणे आहेत. जे हातातून सुटले की फुटणार हे नक्की. विशेष म्हणजे हे सगळं बॅलन्स करणं गरजेचं आहे. कोणत्याही एका चेंडूला धरून पण चालणार नाही. सोबत त्याचं रोटेशन पण सुरू ठेवायचं आणि पडू पण द्यायचं नाही. हिच खरी कसरत आहे आयुष्याची.

सगळं सुरळीत पार पाडण्यासाठी काम (नोकरी, व्यवसाय) योग्य वेळी सुरू करा आणि योग्य वेळी थांबवा देखील. त्याच्यामुळे इतर चार गोष्टींना योग्य न्याय, वेळ देता येईल. त्यांचा बॅलन्स प्रॉपर राहिल. लक्षात घ्या, आयुष्यात एखाद्या गोष्टीला मुल्य आहे हे मुल्य जाणले तरच त्याला मुल्य आहे.

- ब्रायन डायसन (माजी संस्थापक, कोका-कोला)

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.