भारतीय रेल्वे; माहित नसणाऱ्या गोष्टी!

👉 भारतीय रेल्वे; माहित नसणाऱ्या गोष्टी!

सध्या भारतीय रेल्वे दर दिवशी होत असलेल्या नवीन सुधारणांमुळे आणि हायटेक बनण्याच्या दृष्टीने केल्या जात असलेल्या प्रयत्नांमुळे चर्चेत आहे. मात्र या रेल्वेसंदर्भात अधिक माहिती असणेही चांगलेच. आज त्यावर एक नजर टाकूयात...

1) भारतात 16 एप्रिल 1853 ला पहिली रेल्वे धावली. भारतभर रेल्वेची 7,500 स्थानके आहेत आणि नवल म्हणजे त्यातील सर्वात व्यस्त स्थानक दिल्ली किंवा मुंबई नसून ते लखनऊ आहे.

2) दार्जिलिंग हिमायलन रेल्वेला युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला आहे. रेल्वेचे सर्वात जुने इंजिन फेअरी क्वीन आहे. ते 1855 मध्ये वापरात आले आहे.

3) नवी दिल्ली भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस ही देशातील सर्वाधिक वेगवान गाडी असून सर्वात संथ जाणारी गाडी निलगिरी आहे.

4) देशात सर्वाधिक लांबीचा रूट विवेक एक्स्प्रेस ही गाडी पार करते. ती आसाममधील दिब्रुगड पासून कन्याकुमारी पर्यंत 4273 कि.मी.चे अंतर पार करून येते. तर सर्वात छोटा रूट नागपूर-अजनी आहे. हा मार्ग केवळ 3 कि.मी.चा आहे.

5) रेल्वे स्टेशनमधील सर्वात मोठ्या नावाचे स्टेशन चेन्नईतील वेंकटनरसिंहराजुवारिपेटा हे आहे तर सर्वात लहान नावाचे स्टेशन आहे ओरिसातील आयबी व गुजराथेतील ओडी.

6) तिरूवनंतपुरम निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसला फक्त दोन थांबे आहेत व हे अंतर आहे 528 कि.मी. तर अमृतसर हावडा एक्स्प्रेसला तब्बल 115 थांबे आहेत.

7) गुवाहाटी तिरूवनंतपुरम ही दीर्घ अंतर तोडणारी रेल्वे नेहमीच 10 ते 12 तास लेट असते. तिच्या नियमित प्रवासाची वेळ 65 तास 5 मिनिटे आहे.

8) रेल्वेमार्गावरील सर्वात मोठा बोगदा पीर पंजाल हा असून तो 11.215 कि.मी. लांबीचा आहे. 2012 मध्ये तो जम्मू काश्मीर मार्गावर बांधला गेला आहे.

9) रेल्वेचा सर्वाधिक उंचीवरचा पूल चिनाब नदीवर 1180 फुटांवर बांधला गेला असून ही उंची कुतुबमिनारच्या पाचपट आहे.

10) सर्वाधिक लांबीचा प्लॅटफॉर्म गोरखपूर येथे असून तो 1.35 कि.मी. लांबीचा आहे.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?