गृहिणींसाठी काही खास टिप्स...

👉 गृहिणींसाठी काही खास टिप्स...

1) स्वयंपाकघराच्या कानाकोपऱ्यात बोरिक पावडर पसरवा. मुंग्या आणि इतर किटकांचा नाश होणार नाही.

2) भात शिजताना एक चमचा तेल आणि लिंबाचा रस मिसळल्याने भात मोकळा होतो.

3) फरशी चमकदार करण्यासाठी एक कप व्हिनेगरमध्ये गरम पाणी टाकून फरशी साफ करा.

4) वरण शिजताना त्यामध्ये चिमूटभर हळद आणि बदाम तेलाचे काही थेंब टाका. यामुळे वरण लवकर शिजते आणि स्वादिष्ट होते.

5) स्वयंपाकघरात काम करत असताना जर तुम्हाला चटका लागला तर भाजलेल्या जागी बर्फ चोळा. बटाटा किसून घासा. तूप, खोबरेल तेल किंवा केळं कुस्करून लावा.

6) महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांडयात जाडे मीठ बारीक करा. यामुळे पात्यांना पुन्हा धार येते.

7) बटाट्याचे पराठे चवदार बनवण्यासाठी त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घाला.

8) रात्री चणे भिजवायला विसरला असाल तर सकाळी उकळत्या पाण्यात चणे भिजवा. यामुळे ते लवकर फुलतील.

9) कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येते त्यामुळे कांदा हलकासा गॅसवर गरम करा किंवा कांदे फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे कांदे चिरताना डोळ्यातून पाणी येणार नाही.

10) मिरचीची देठे काढून फ्रिजमध्ये ठेवावी. यामुळे मिरच्या जास्त वेळ ताज्या राहतात.

11) लिंबाचा रस काढण्यापूर्वी लिंबू गरम पाण्यात काही वेळ ठेवा. त्यानंतर लिंबू कापल्याने त्यातून भरपूर रस निघतो.

12) साखरेच्या डब्यात 6-7 लवंगा ठेवा. साखरेला मुंग्या लागणार नाहीत.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?