Recipes Katta

Recipes Katta

👉 मॅगी मसाला

साहित्य - 1½ चमचा कांदे पूड, 1½ चमचा लसुण पूड, 1½ चमचा धणेपूड, 1 चमचा तिखट, ½ चमचा हळद, 1 चमचा जिरपूड, 1 चमचा काळेमिरे पूड, ¼ चमचा मेथी पाउडर, ½ चमचा आल पूड (सुंठ), 1 चमचा गरम मसाला, 4 चमचे साखर, 2 चमचे रेड चिली फ्लेक्‍स, 1 चमचा मक्याचा आटा (कार्नफ्लोर), ½ चमचा अमचूर पूड, 1½  चमचा मीठ. 

कृती - प्रथम वर दिलेले सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून मिक्सरमधून काढून घ्या. नूडल्स तयार कराल तेव्हा त्यात 2 चमचे हा मसाला घाला. जर तुम्हाला जास्त स्पायसी आवडत असेल तर हा मसाल थोडा जास्त घालू शकता.


👉 ऑरेंज अपीटाइझर

साहित्य - 6 संत्री, अर्धा चमचा आल्याचा किस, 6 ते 8 पुदिन्याची पाने, 1 टेबलस्पून मध, 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा सैंधव मीठ, 3 ते 4 बर्फाचे छोटे क्यूबस्.

कृती - सर्वप्रथम संत्र्याचा रस काढून तो गाळून घेणे. नंतर त्यात आलं, पुदिन्याची पाने, मध, लिंबाचा रस, पिंक संचर, बर्फ घालून हॅन्डमिक्सरने चर्न करणे. हे मिश्रण गाळून ग्लासमध्ये ओतून थंडगार सर्व्ह करावे. उन्हातून आल्यावर किंवा जेवणापूर्वी हे प्यावे. कारण हे अतिशय फायदेशीर आहे.


👉 स्ट्रॉबेरी सूप

साहित्य - 2 कप स्ट्रॉबेरी, 50 ग्रॅम साखर, 1 चमचा कॉर्न फ्लॉवर 1/2कप पाण्यात घालून एकजीव करावे, 2 चमचे लिंबाचा रस, सजावटीसाठी फेटलेली क्रीम.

कृती - सर्वप्रथम 3 कप पाण्यात स्ट्रॉबेरी उकळून घ्यावी. थंड झाल्यावर त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यावे. त्यात साखर, लिंबाचा रस व एकजीव केलेले कॉर्न फ्लॉवर घालून एक उकळी आणावी व फ्रीजरमध्ये थंड होण्यासाठी ठेवावे. सर्व्ह करताना त्यावर क्रीम घालून सर्व्ह करावे.

Comments

Popular posts from this blog

рд╕рдорд░्рде рд░ाрдорджाрд╕ рд╕्рд╡ाрдоींрдЪी рдЕрддिрд╢рдп рд╕ुंрджрд░ рд░рдЪрдиा. рд╣ी реиреж рдХрдбрд╡ी рдо्рд╣рдгрдЬे реиреж рд░рдд्рдиे рдЖрд╣ेрдд.

рдоूрд▓рдЧीрдЪी рддрдХ्рд░ाрд░ - рдХрд╡िрддा

рд╢िрд╡рдЬрдпंрддी рддिрдеीрдк्рд░рдоाрдгे рдХा ?