भारतातील यशस्वी व्यक्तिमत्व...

भारतातील यशस्वी व्यक्तिमत्व ...!

🍄  धीरुभाई अंबानी -  रिलायन्स समुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानींचा जन्म गुजरातमधील चोरवामध्ये झाला होता. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. धीरुभाईंनी यमेनमध्ये एका पेट्रेल पंपावर काम केले होते. त्यानंतर मुंबईत त्यांनी मसाले आणि कपड्याच्या धाग्यांचा व्यापारदेखील केला. १९६६ मध्ये त्यांनी पहिल्यांदा अहमदाबादमध्ये स्वत:ची कपड्यांची कंपनी ऊभी केली. २००२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी श्रीमंताच्या जागतिक क्रमवारीत ते १३८ व्या स्थानावर होते.

🍄 नारायण मूर्ती -  आपल्या पत्नीकडून केवळ दहा हजार रुपये उधार घेऊन १९८१ मध्ये आपल्या सहा सहकाऱ्यांसोबत नारायण मूर्तींनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. आयआयटी कानपूरमधून मास्टर्स केल्यानंतर त्यांनी पुणे आणि पॅरिसमध्ये काही काळ काम केले. त्यांनी स्थापन केलेल्या इन्फोसिसचा दबदबा जगभरात आहे

🍄 देवी प्रसाद शेट्टी -  कर्नाटकमधील एका छोट्याशा खेड्यात देवी प्रसाद शेट्टींचा जन्म झाला होता. केवळ नऊ दिवसांच्या अर्भकावर व्हिडिओच्या माध्यमातून कार्डिअॅक सर्जरी आणि ओपन हार्ट सर्जरीसाठी मदत करणारे पहिले डॉक्टर म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. २००१ मध्ये त्यांनी नारायण हरदयाल रुग्णालयाची स्थापना केली. आज त्याची २१ मेडिकल सेंटर्स आहेत. लाखो भारतीयांना स्वस्तात कार्डिअॅक सर्जरी उपलब्ध करून देण्याचा मान त्यांना जातो.

🍄 सीपी कृष्णन नायर -  पंचतारांकित हॉटेल व्यवसायातील प्रसिद्ध 'द लीला ग्रुप'चे संस्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचा जन्म केरळमधील एका गरीब कुटुंबात झाला होता. शिष्यवृत्ती प्राप्त करून शिक्षणाची वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतीय सैन्यदलात नोकरी मिळवून कॅप्टनपद प्राप्त केले. भारतीय कपड्यांना परदेशात प्रसिद्धी मिळावी म्हणून १९५१ मध्ये त्यांनी ऑल इंडिया हॅण्डलूम बोर्डाची स्थापना केली. तर १९८७ मध्ये कृष्णन यांनी त्यांच्या पहिल्या लीला हॉटेलची स्थापना मुंबईत केली.

🍄 राकेश झुनझुनवाला -  राकेश झुनझुनवाला यांची भारताचे वॉरेन बफे अशीदेखील ओळख आहे. अॅसेट मॅनेजमेंट रेअर एन्टरप्रायझेजचे मालक राकेश झुनझुनवाला यांची या क्षेत्रात चांगलीच लोकप्रियता आहे. आपल्या महाविद्यालयीन दिवसांमध्येच त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. २०१६ मध्ये त्यांचे कौटुंबिक उत्पन्न दहा हजार कोटी रुपये इतके असताना त्यांनी त्यांच्या उत्पन्नाचा २५ टक्के हिस्सा दान करण्याची घोषणा केली होती. २०२१ मध्ये वयाच्या ६०व्या वर्षी आपण आपल्या उत्पन्नाचा २५ टक्के हिस्सा अथवा पाच हजार कोटी दोहोंपैकी कमाल रक्कम समाजकार्यासाठी दान करणार असल्याची घोषणा त्यांनी २०१६ मध्ये केली

🍄 कल्पना सरोज -  मेटल ट्यूब कंपनी कमानी ट्यूब्सच्या प्रमुख कल्पना सरोज यांचे यशदेखील नेत्रदीपक आहे. भारतीय समाज व्यवस्थेचा दाह अनुभवलेल्या कल्पना सरोज यांचे १२ व्या वर्षी जबरदस्तीने लग्न लावण्यात आले होते. तर वयाच्या १४ व्या वर्षी त्यांना शाळा सोडावी लागली होती. कर्जात बुडालेली कमानी ट्यूब्स कंपनी २००६ मध्ये खरेदी करून त्यांनी कंपनीला वैभव प्राप्त करून दिले.

🍄 कर्सनभाई पटेल -  निरमा या डिटर्जंट पावडर कंपनीचे संस्थापक कर्सनभाई पटेल यांनी प्रथम घराच्या मागील जागेत डिटर्जंट पावडरची निर्मिती केली आणि दारोदार जाऊन विकली. १९६९ मध्ये त्यांनी निरमा कंपनीची स्थापना केली. आपली स्वर्गिय कन्या निरिमाच्या नावावरून त्यांनी कंपनीचे नाव निरमा असे ठेवले होते.

🍄 प्रताप सी रेड्डी -  १९७९ मध्ये पहिले अपोलो हॉस्पिटल सुरू करणाऱ्या प्रताप रेड्डी यांचा जन्म पूर्व मद्रासमधील एका छोट्याशा गावात झाला होता. सुविधांच्या अभावामुळे एका तरुण रुग्णाचे प्राण न वाचवू शकल्याने कार्डिओलॉजिस्ट रेड्डी खूप व्यथित झाले आणि चेन्नईमध्ये १५० बेडचे पहिले अपोलो हॉस्पिटल उभारले. अपोलो हॉस्पिटल भारतामधील सर्वात मोठ्या हॉस्पिटल साखळीतील एक आहे

🍄 राधाकृष्णन दमानी -  एक यशस्वी स्टॉक मार्केट ब्रोकर म्हणून यश प्राप्त केल्यानंतर २००२ मध्ये राधाकृष्णन दमानी यांनी रिटेल क्षेत्रात पाय रोवला. D-Mart या सुपर मार्केट चेनचे ते मालक आहेत. त्यांनी मुंबईमध्ये पहिल्या D-Mart स्टोअरची स्थापना करून आपल्या व्यवसायाची स्थापना केली. आज भारतातील पहिल्या पंधरा श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?