सुखी घरासाठी हे आहे आवश्यक

🍄 सुखी घरासाठी हे आहे आवश्यक

नेहमी सारखेच दिवस राहत नाहीत. ताण-तणाव असला की प्रत्येक कुटुंबात वेगळेच वातावरण असते. मोठ्या कुटुंबात खूप लहान मुले असल्यास याची दाट शक्य ता असते. प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असल्याने वाद होतात. अशावेळी घरात शांत वातावरण कसे ठेवावे.....

👉 संवाद साधा – तुमच्या मुलांचे भावंडांशी पटत नसेल अथवा तुमची मुलगी नाराज असल्यास बोलण्याचा प्रयत्न करा. संबंधित सर्व जण बोलत नाही, तोपर्यंत समस्या सुटून नाराजी दूर होणार नाही. उलट विसंवादातून त्या वाढत जातील.

👉 तडजोडीची तयारी असू द्या – घरात शांतता राखण्यासाठी एका व्यक्तीने समोर येऊन तडजोड करणे आवश्यवक असते. अशावेळी ही तडजोड करणारे तुम्हीच पहिले असाल याची तयारी ठेवा. यातून भांडण मिटवा. एखाद्याचा सल्ला तुम्हाला मान्य नसला तरी त्या व्यक्तीशी शांतपणे बोला. समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा व त्याचवेळी माफ करणारी मोठ्या मनाचा व्यक्ती व्हा.

👉 आनंददायी कार्यक्रमाचे आयोजन – घरातच मजा करणारे कार्यक्रम आयोजित करा. यातून सर्व कुटुंबिय एकत्र येतात. हा एकमेकांमध्ये बॉण्डींग तयार करण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. यातून ताणदेखील हलका होतो. एखादी सहल आयोजित करा. जेथे घरातील सर्व जण धकाधकीच्या आयुष्यातून मोकळे होतील. दूरच्या नातलगांनादेखील निमंत्रित करा.

🍄 एकाकी पणा वाटतोय तर हे करा...

आपलं लाइफ खूप फास्ट झालंय. सतत काही ना काही घडत असतं. आपण बरं आणि आपलं बरं, उगीच लोकांच्या भानगडीत कशाला पडा अशी अॅयटिटय़ूड असते लोकांची. इतरांशी संबंध खूप वरवर ठेवले जातात. त्यातूनच एकाकीपणा हा एक आजार निर्माण झाला आहे

या एकाकीपणावर उपाय काय?

👉वेळ जात नाही, कंटाळा आला म्हणून उगीचच सोशल मीडियावर जायचं नाही.

👉इतरांशी मैत्री करायचा आपणहून, प्रोअॅीक्टिव्हली प्रयत्न करायचा.

👉नव्यानं मैत्री करताना आपल्या सगळ्या गैरसमजुती, अपेक्षा बाजूला ठेवायच्या.

👉प्रत्येक जण आपला खास, जवळचा दोस्त व्हायला हवा/हवी असा अट्टहास नाही करायचा. काही मैत्रिणी फक्त अभ्यासापुरत्या, काही मजेपुरत्या असतील आणि त्यातली एखाद-दुसरीच मनातलं शेअर करायला मिळेल याचं भान ठेवायचं.

👉व्यायाम आणि हॉबीज हेही आपले चांगले दोस्त बनू शकतात.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?