शेतकऱ्यांची व्यथा

शेतकऱ्यांची व्यथा

कांद्याला काडी लावली
तंबाटे वावरात सडली
सोयाबीन मध्ये गुरं घातली
एवढी सर्व बरबादी
सरकारी धोरणामुळे आली ...

मार्केट यार्डात लिलाव ऐकून
मेथीची जुडी
ढसा ढसा रडली
ते पाहून शेपू म्हणाली
जाऊदे ताई ,
आपले तर केवळ भाव पडले
वांगे आणि बटाटे तर
उकिरड्यात गाडले .....

कोथंबीर आणि पालकला
कोणी पालक उरला नाही
मका तर दरवर्षी पडतो
म्हणून यंदा पेरला नाही ....

वाल आणि वटाणा
खुडायलाही महाग आहे
व्यापारी आणि अडते म्हणजे
आयत्या बिळात नाग आहे ....

भेंडी म्हणते
साऱ्या जगण्याचीच कोंडी झाली
भडवलदारांनी तर
संससदेचीच मंडी केली ....

कारले म्हणाले
मी मुळातच कडू आहे
पण एफआरपी साठी
उसाच्याही डोळ्यात रडू आहे ....

फ्लॉवर आणि कोबीकडे
सर्वानीच फिरवली पाठ
ढोबळी मिरचीने लावली
उरली सुरली वाट ....

मिर्ची म्हणाली
मी बोलले तर
सरकारला मिरच्या झोंबतील
आता शेतकरी
स्वतःला टांगून घेताय
उद्या तुम्हाला टांगतील.....

अच्छे दिनाच्या गाजराला
भलताच भाव आला
त्यांच्या शपथविधी चालू असतांना
एका शेतकऱ्याचा जीव गेला .....

कधी कधी वाटतं
खुशाल वेड्या बाभळी उगवू द्याव्या
कुठलंच पीक घेऊ नये
हामी भाव दिल्याशिवाय
शेतात पाय सुद्धा ठेवू नये
😌😌😌😌😌😌😌
      आपलाच
   सामान्य शेतकरी बांधव

-----------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?