दररोज कांदा खाल्ल्याचे फायदे

दररोज कांदा खाल्ल्याचे फायदे

भारतीय आहार पद्धतीमध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे कांदा. कांदा जेवणाला स्वादिष्ट करण्याबरोबरच यात उत्तम औषधी गुणधर्म आढळतात. म्हणून अनेक आजारांवर कांदा रामबाण उपाय ठरतो. एक नजर टाकुयात कांदा खाण्याच्या फायद्यावर...

👉 कांदा हा थंड असल्याने जर तुमच्या हातावर जळहळ होत असेल तर त्या जागेवर कांदा लावा.

👉 जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर दररोज सकाळी दोन चमचे कांद्याचा रस प्या.

👉 जर एखादा किडा तुमच्या शरिरावर चावला असेल तर त्यावर लगेच कांद्याने घासा. याने तुम्हाला लवकर आराम मिळेल.

👉 सर्दी आणि घशातली खवखव दूर करण्यासाठी नेहमी कांद्याचा रस प्यावा.

👉 जर तुम्हाला कुत्र्याने चावले असेल तर त्या जखमेवर कांदा कापून मधात मिक्स करून लावा. त्याने विषाचा प्रभाव कमी होतो.

👉 कांदा खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास सहजरित्या दूर केला जाऊ शकतो.

👉 मासिक पाळीदरम्यान पोट दुखत असेल किंवा पाळी अनियमित असेल तर कांद्याचं सेवन करावं.

👉 कांदा खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित केला जाऊ शकते. शिवाय कोलेस्ट्रॉलही नियंत्रित ठेवता येतो.

👉 ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे. त्यांच्यासाठी कांदा रामबाण आहे. दररोज कांदा खाल्ल्याने हृदयाचे आजारांचा धोका कमी होतो.

👉 मुलांना अतिसार झाल्यास कांदा बारीक करून त्यांच्या नाभिवर लावा किंवा कपड्यात बांधून पोटावर लावा.

👉 कांद्याच्या सेवनाने चांगली झोप येते आणि कॅलरी बर्न होण्यासही कांद्याची मदत होते.

👉 तणाव कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात कांद्याचा वापर करावा.

👉 मधुमेहग्रस्त लोकांनी तसेच  ज्यांचे केस गळतात त्यांनी कांदा खावा.

👉 कांदा खाल्ल्याने शुक्राणू संख्या आणि गुणवत्ता वाढते.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?