Kitchen Recipes

Kitchen Recipes

👉 भरलेली शिमला मिरची

साहित्य

शिमला मिरची I 3 उकडलेले बटाटे I अर्धा कप वाटाणे I एक टोमॅटो I सुके मसाले I तूप I कांदा

कृती

शिमला मिरची पाण्यात उकळवून घ्यावी. आता एका कढईत एक पळी तूप टाकून जिरे भाजावे. दिड चमचा मीठ, 2 चमचे धणे, एक चमचा हळद, 1 /2 चमचा तिखट, 2 चमचे कढईत टाकुन भाजावे. उकळलेले बटाटे व उकळलेले वाटाणे टाकुन हलवावे. टोमॅटो टाकावे व चांगल्या तऱ्हेने फिरवावे मिश्रण सुके झाले पाहिजे. आता शिमला मिरचीत हे मिश्रण चांगल्या तऱ्हेने दाबून भरावे.

👉 असे बनवा उपवासाचे ढोकळे

साहित्य

200 ग्रॅम भगर I 100 ग्रॅम राजगिरा पीठ I 100 ग्रॅम सिंगाड्याचे पीठ I चवीनुसार शेंद मीठ I एक वाटी दही I एक चमचा सोडा I तळण्यासाठी तेल व थोडे जिरे

कृती

भगर 2 तास पाण्यात भिजत ठेवावी. दह्याला फेटून त्यात राजगिरा व सिंगाड्याचे पीठ टाकावे. भगर बारीक वाटून त्यात सर्व साहित्य टाकावे व त्यात एक चमचा सोडा व मीठ टाकून कुकरच्या भांड्यात ठेवून एक शिटी येऊ द्यावी. थंड झाल्यावर त्याचे काप करावे व तेल गरम करून त्यात जिऱ्याची फोडणी द्यावी.

👉 असे बनवा वांग्याचे भरीत

साहित्य

2 मोठी कोवळी वांगी I 2 पातीचे कांदे I 1चमचा चाट मसाला मसाला I 3/4 चमचा साखर I 3 चमचे ओले खोबरे I कोथिंबीर I अर्धा चमचा तेल I चवीनुसार मीठ

कृती

वांगी स्वच्छ धुवावी. अर्धा चमचा तेलाचा हात वांग्यावरून फिरवून ती भाजून घ्या. भाजल्यानंतर ताटलीत ठेवून त्याचे साल व देठे काढावी. गर हाताने किंवा चमच्याने कुस्करावा. कांदे बारीक चिरावे व गरात कच्चेच मिसळावे. इतर साहित्य घालून भरीत कालवावे.

Comments

Popular posts from this blog

рд╕рдорд░्рде рд░ाрдорджाрд╕ рд╕्рд╡ाрдоींрдЪी рдЕрддिрд╢рдп рд╕ुंрджрд░ рд░рдЪрдиा. рд╣ी реиреж рдХрдбрд╡ी рдо्рд╣рдгрдЬे реиреж рд░рдд्рдиे рдЖрд╣ेрдд.

рдоूрд▓рдЧीрдЪी рддрдХ्рд░ाрд░ - рдХрд╡िрддा

рд╢िрд╡рдЬрдпंрддी рддिрдеीрдк्рд░рдоाрдгे рдХा ?