किचन मध्ये बिन्दास्त करिअर

किचन मध्ये बिन्दास्त करिअर

प्रत्येकाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असतेच. त्यामुळे अनेकजण आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्यात करिअर करून पुढे जात असतात. पण स्वयंपाकघरात वेगवेगळे पदार्थ बनवण्याच्या कलेत कसलं आलंय करिअर? असा आपला समज होऊ शकतो. परंतु ही आवडही आपलं करिअर बनवू शकते, यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही.

कसं कराल हे करीअर...

घरात अनेक महिला वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवण्यात अगदी तल्लीन असतात. त्यासाठी त्यांच्या या कलेचं अनेकांकडून तोंडभरून कौतुकही होत असतं. तू अगदी अन्नपूर्णा आहेस, अशाप्रकारची शाबासकीही मिळत असते. मात्र, यामध्ये ही आपल्याला करीअर करता येऊन चांगला पैसा मिळवता येवू शकतो, याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. पण त्यात करिअर करायचं ठरवलं आणि ते पूर्ण केलं, तर मात्र तुम्ही स्वत:वरच जाम खूश व्हाल. या क्षेत्रात जाण्यासाठी या काही टिप्स...

🍄 शेफ :  आपल्याला वेगवेगळ्या पदार्थांच्या डीश बनवण्याची आवड असेल, तर कुकिंगच्या क्षेत्रात आपल्याला शेफ या पदापर्यंतही पोहचता येऊन त्यात करिअर करता येऊ शकते.

🍄  फूड क्रिटिक :  फूड क्रिटिकसाठी आपल्याकडे लिहिण्याच्या आवडीबरोबरच अभिव्यक्तीची कला अवगत असणे आवश्यक आहे. ज्यामुळे आपल्याला लिखाणाच्या माध्यमातून पदार्थांच्या रेसिपीज लोकांपर्यंत पोहचवता येतील. या पदासाठी सध्या खूप मागणी असलेली पाहायला मिळतेय.

🍄  न्युट्रिशनिस्ट :  ज्या वेळी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थ बनवण्याच्या कलेबरोबरच आपल्याला त्याविषयी इतरांना चांगल्याप्रकारे माहीती देता येत असेल, तर त्यात फक्त अन्नपदार्थांवरच नाही, तर आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक अशा पदार्थांविषयीची माहीती लोकांना देता येऊ शकते. आपल्याला करिअर करण्याची ही एक चांगली संधी आहे.

🍄  फूड स्टायलिस्ट :  यामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्याबरोबरच त्याचे प्रेझेंटेशनही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी फूड स्टायलिस्टच्या माध्यमातून आपल्याला मोठमोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, तसेच वर्कशॉप्समध्ये आपल्या पदार्थांविषयीची माहीती  पोहोचवता येऊ शकते.

🍄  ऑर्गेनिक फार्मिंग :  एखाद्याला ट्रॅव्हलिंग करण्याची आवड असेल, तर त्यासाठी ऑर्गेनिक फार्मिंग हा पर्याय अत्यंत उत्तम आहे. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी हा एक चांगला मार्ग तर आहेच, परंतु यामध्ये करिअर करून स्वत:ला एक चांगला फूडप्रेी म्हणून नवी ओळखही निर्माण करता येऊ शकते.

🍄  केटरर :  यामध्ये आपल्याला स्वत:चा व्यवसाय करता येऊन चांगल्याप्रकारे पैसे मिळवता येतील. लग्न, पाट्र्या तसेच काही कार्यक्रमांध्ये आपल्याला एक चांगली सेवा देता येईल. व्यवसाय पुढे नेण्यास त्याची मदत होते.

🍄  बेकर :  चांगल्या बेकर्सला या क्षेत्रात नेहमीच मागणी असते. केक, नानकटाई तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज प्रत्येक ठिकाणी मिळतात. त्यासाठी तुम्ही एक चांगला बेकर असाल तर त्यामध्ये चांगले करिअर करता येऊ शकते.

🍄  आइस्क्रिम टेस्टर :  अशाप्रकारचा जॉब असतो हे ऐकायला जरी नवीन वाटत असले, तरीही यामध्येही चांगल्याप्रकारे जॉब करता येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला स्वीट पदार्थांची आवड असणे आवश्यक आहे.

🍄  चॉकलेटीयरयामध्ये आपल्याला चॉकलेटच्या काही कन्फेशनरीज बनवता यायला हव्यात. त्यासाठी चॉकलेटची आवड असणे आवश्यक आहे.

🍄  फूड फोटोग्राफर : नेहमीच काहीतरी क्रिएटीव्ह करू इच्छिणा-या लोकांना फूड इंडस्ट्रीमध्ये जॉबची कमी नाही. त्यामध्ये वेगवेगळ्या डिशेसचा आस्वाद घेत असतानाच आपली फोटोग्राफीची आवडही आपल्याला पूर्ण करता येऊ शकते. त्यासाठी रेस्टॉरंट्स किंवा मॅगझीन्समध्ये मागणी असते.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?