Career Guidance


कामाच्या ठिकाणी आचरण

सध्या कुठेही काम करताना आपल्याकडील ज्ञान , आपला पेहराव, स्वभाव आणि आपले आचरण सर्वात महत्वाचे असते. आपण काम करत असलेल्या ठिकाणी आपल्या हुद्द्याप्रमाणे आपले आचरण असणे आवश्यक असते. यासाठी आपण काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत.

🍄 प्रामाणिकपणा
आपण ज्या ठिकाणी काम करत आहोत त्या ऑफिसशी व कामाशी प्रामाणिक राहणे अत्यंत आवश्यक बाब आहे. कार्यालीन वेळात आपली स्वतःची वैयक्तिक कामे करणे चांगल्या आचरणाच्या विरुद्ध असते. आर्थिक गोष्टींशी संबंधित जबाबदारी आपल्याकडे असले तर स्वतः जास्त प्रामाणिक राहण्याची गरज असते.

🍄 कार्यालयीन राजकारणापासून दूर राहणे
बऱ्याच  वेळा ऑफिसमध्ये दोन ग्रुप पडलेले असतात.अशावेळी काही व्यक्ती कार्यालयीन बाबी चुकीच्या पद्धतीने पसरवत असतात. अशा व्यक्तींपासून सावध रहावे. आपली प्रतिमा स्वच्छ ठेवावी.

🍄 आदर
कार्यालयामधील बॉस, वरिष्ठ अधिकारी यांचा योग्य ठिकाणी योग्य मान ठेवणे आवश्यक असते. . ऑफिसमध्ये अथवा ऑफिसबाहेर त्यांच्या बरोबर काम करताना त्यांच्याशी आदरपूर्वक संभाषण करणे हा चांगल्या अचराणाचाच एक भाग आहे. ह्याच्या पुढे जाऊन आपल्या पेक्षा कनिष्ठ लोकानाही आपण आदर दिला तो आपलाच मोठेपणा समजला जातो.

🍄 माफी मागण्याची प्रवृत्ती
ऑफिसमध्ये काम करत असताना आपल्याकडून अनेक चुका होत असतात, परंतु आपण वेळोवेळी त्या लपवण्याचा अथवा दुसऱ्यांवर ढकलण्याचा प्रयत्न करतो. असे न करता प्रामाणिकपने आपल्याकडून झालेली चूक मान्य करून संबंधित व्यक्तीची माफी मागणे कधीही योग्य ठरते.

प्रोफेशनल वागण्याचे महत्त्व

🍄 गॉसिप नकोच
तुम्ही कामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीत रस न घेतल्याने गॉसिप या गोष्टीशी तुमचा संबंध येत नाही. त्यामुळे तुमच्या विषयी कोणत्याही अफवा, अथवा चुकीची माहिती सहकाऱ्यांमध्ये पसरत नाही. तेव्हा जिथे जिथे गॉसिप टाळणे शक्य असेल, तिथे ते टाळा.

🍄 सहकाऱ्यांशी सुसंवाद आणि टीम वर्क
टीममध्ये काम करताना सर्वांना सहकार्य करत काम करणे जमले पाहिजे. तुमच्यातील सुसंवादामुळे तुमचे आणि तुमच्या सहकाऱ्यांचे संबंध चांगले राहण्यास मदत होते. कोणाविषयीही वैयक्तिक राग न ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सोबत असलेल्या अनुभवी व्यक्तींना योग्य तो मान देणे कधीही योग्य ठरते. एखादी जबाबदारी किती मोठी आहे, ती स्वीकारणे तुम्हाला झेपेल का नाही याचा पूर्ण विचार करून मगच ती जबाबदारी स्वीकारा. स्वीकारलेल्या जबाबदारीची डेडलाइन पाळण्याचा प्रयत्न करा.

🍄 घर आणि ऑफिसमध्ये अंतर राखा
घरातील कोणतेही प्रॉब्लेम ऑफिसच्या कामामध्ये आणू नका. त्याचा परिणाम कामावर होऊ देऊ नका. त्याचप्रमाणे ऑफिसमधील कामही शक्यतो घरी न नेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामाच्या वेळांचे आणि कामाचे योग्य नियोजन केल्यास तुम्ही तुमचे काम अधिक चांगल्या प्रकारे पार पाडू शकता.

🍄 योग्य अंतर राखा
सहकाऱ्यांशी वागताना, बोलताना त्यांच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये कधीही पडू नये.
तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करून तुम्ही पुढे जात राहिलात, तर तुम्ही परफेक्ट प्रोफेशनल बनू शकता हे लक्षात ठेवा. प्रोफेशनल वागण्याने तुमचा नक्कीच फायदा होतो.

🍄 स्मार्ट वर्क  करा
कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी स्वतःची टिपणे काढा. या टिपणांमध्ये कामाची पद्धत, कामासाठी आवश्यक असणारा अंदाजे वेळ याचीही नोंद करा. पूर्वतयारी नेमकी असेल, तर आयत्यावेळी धावपळ करायला लागत नाही. अवांतर वाचनाची आवड नसेल, तर विषयाशी संबंधित नेमके वाचन करण्याची सवय लावून घ्या.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?