नावे लक्षात राहत नाहीत..?

👉 नावे लक्षात राहत नाहीत..?

एखादी व्यक्ती समोर आल्यानंतर त्यांच्या नावाने हाक मारणं हे आपुलकीच लक्षण असते. मात्र अनेक वेळा आपण एखाद्या व्यक्तीला ओळखत असतो पण त्याच नाव लक्षात नसतं म्हणून घोळ होऊन बसतो. त्या व्यक्तीला पुन्हा नाव विचारलं तर त्याला राग येण्याचीही शक्यता असते. म्हणून व्यक्तींची नावे कशी लक्षात ठेवावीत त्याबद्दल खास टिप्स...

👉 तुम्हाला कोणी त्याच नाव सांगत असेल तर दुर्लक्ष न करता ते नाव काळजीपूर्वक ऐका.

👉 नाव व्यवस्थित लक्षात राहाण्यासाठी समोरची व्यक्ती नाव सांगत असताना पूर्ण लक्ष संबंधित व्यक्तीवरच केंद्रित करा.

👉 तुमच्या बोलण्यात त्यांचं नाव परत परत वापरा पण प्रमाणापेक्षा जास्त उल्लेख करू नका.

👉 अशावेळी समोरच्या व्यक्तीचे व्हिजिटिंग कार्ड घ्या. यामुळे त्या व्यक्तीच नाव व चेहरा चिरकाल आठवणीत राहील.

👉 तुम्हाला एखाद नाव जरा अवघड वाटत असेल तर त्याची स्पेलिंग लक्षात ठेवा. त्या व्यक्तीला स्पेलिंग विचारा यामुळे चेहरा व नाव लक्षात राहण्यास मदत होईल.

👉 एखाद्याशी ओळख झाल्यावर, त्या व्यक्तीची थोडक्यात माहिती आणि नाव नोंदवून ठेवा. यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवायला मदत होईल.

👉 एखाद्या व्यक्तीच नाव ऐकताच क्षणी त्यां नावासबंधी कल्पना करा किंवा त्याच नाव एखाद्या घटनेला जोडा. अशाप्रकारे वेगळ्या पद्धतीने तुम्ही नाव लक्षात ठेऊ शकता.

👉 नवीन भेटलेल्या व्यक्तीशी बोलताना त्याचं नाव तुम्हाला भेटलेल्या नावाच्या व्यक्तीशी जोडण्याचा प्रयत्न करा म्हणजे नाव लक्षात ठेवणं सोपे जाईल.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?