स्पर्धा परीक्षा ; तंत्र अभ्यासाचे

👉 स्पर्धा परीक्षा ; तंत्र अभ्यासाचे

सध्या स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थ्यांचा मोठा कल दिसून येत आहे. यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अनेक जागा सुटल्या असून अनेकांनी अभ्यासाची जोरदार तयारी सुरु केली आहे. नियोजनबद्ध अभ्यास न केल्यामुळे अनेक जणांना अपयश येते म्हणून अभ्यास कसा करावा त्यावर एक नजर टाकूया...

👉 तुम्ही जी परीक्षा देणार आहेत त्या परीक्षेचा अभ्यासक्रम जाणून घ्या.

👉 अभ्यासक्रमानुसार कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा ते ठरवा.

👉 जास्त वेळ जागरण करून अभ्यास करू नका. पुरेशी झोप घ्या.

👉 दररोज दैनिकाचे सविस्तर वाचन करून त्यातील महत्वाचे मुद्दे नोंद करून ठेवा.

👉 योजना, कुरुक्षेत्र, लोकराज्य या मासिकातील अभ्यासक्रमासंदर्भात लेख आवर्जून वाचा.

👉 इतिहास विषयाचा अभ्यास करताना क्रमिक पुस्तकापासून सुरुवात करा.

👉 भूगोल विषयाच्या तयारीसाठी पाचवी ते बारावी पर्यंतच्या क्रमिक पुस्तकाचे वाचन करा.

👉 आर्थिक व सामाजिक विकास तसेच भारतीय राज्यघटना या घटकासाठी अकरावी - बारावी ची क्रमिक पुस्तके वाचा.

👉 विज्ञान व तंत्रज्ञान या घटकासाठी सहावी ते दहावी पर्यंतची क्रमिक पुस्तके वाचा.

👉 पुस्तकाच्या अनावश्यक भागाचे अध्ययन टाळा.

👉 अभ्यास करत असताना महत्वाच्या गोष्टी नोंदवून ठेवा. यामुळे वेळ वाचेल.

👉 लेखन सरावास वेळ राखून ठेवा. महत्वांच्या विषयाला जास्त वेळ द्या.

👉 वाचनाचा कंटाळा आला असेल तर अशा वेळी गट चर्चा करण्यास हरकत नाही.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?