गाणी ऐकण्याचं व्यसनं लागलंय?

👉 गाणी ऐकण्याचं व्यसनं लागलंय?

व्यसन फक्त दारू, सिगारेट किंवा अंमली पदार्थाचं असतं असं नाही बरं का! तर संगीत ऐकण्याचंही असू शकतं. गाणी ऐकल्याने रिलॅक्स वाटतं, मूड फ्रेश होतो यात काहीही शंका नाही. आपल्या आवडत्या संगीतावर थिरकणं चांगलं असलं तरी सतत गाणी ऐकावशी वाटणं आणि कानात इयरफोन घालून बसणं योग्य नाही. जर तुमच्यासोबत असं होत असेल तर तुम्हाला गाणी ऐकण्याचं व्यसनं लागलंय म्हणून समजा. यामुळे तुमच्या आरोग्यावर तसेच व्यक्तिमत्वावर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला हे व्यसनं जडलं तर पुढील बाबींचा नक्की विचार करा...

👉 गाणी ऐकण्यासाठी किती वेळ घालवलाय हे जाणून घ्या. सतत गाणी का ऐकावीशी वाटतात याचा विचार करा.

👉 सतत गाणी ऐकण्यामागची कारणं शोधा. बोलायला कुणी नाहीये का, कुणाशी बोलावंसं वाटतं नाही का, गाणी ऐकल्याने समाधान वाटतंय का या बाबींचा विचार करा.

👉 आपल्याला संगीताचं व्यसनं जडलंय हे अनेकांच्या डोक्यातच शिरतच नाही. अर्थातच यात चुकीचं काहीच नसल्याने हे व्यसन आहे याची जाणीवच होत नाही. त्यामुळे गाणी ऐकण्यात किती वेळ जातोय हे मोजा.

👉 इयरफोन डोळ्यांसमोर ठेऊ नका. घरी आल्यावर ड्रॉवरमध्ये ठेवून द्या. इयरफोनवर नजर पडणार नाही याची काळजी घ्या..

👉 फावल्यावेळेत, प्रवासात किंवा मनोरंजन म्हणून काही वेळ आपल्या आवडतं संगीत ऐकणं हे ठिक. पण महत्वाची काम बाजूला सारून गाणी ऐकत बसणं हे कितपत योग्य आहे याचा विचार करा.

👉 काही क्षणात माणसाचा मूड बदलवण्याची ताकद संगीतात आहे. मात्र याचा उपयोग आपल्यात पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी करता आला तर? याचा विचार करा. जसे की, मोटिव्हेटिंग मूव्हिजचे गाणे ऐकणे.

👉 आपल्याकडून संगीताचा ओव्हरडोस होतोय असं लक्षात आले तर लगेचच आपले मन वळविणारी कृती करा. एकटं बसू नका, मित्रांमध्ये जा, आपल्या आवडत्या व्यक्तिशी फोनवर बोला किंवा इतरही तुम्हाला आवडणारी कृती तुम्ही करू शकता.

वरील बाबी तुम्हाला गाण्याचं व्यसन लागण्यापासून नक्कीच परावृत्त करतील.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?