मुलांच्या केसांची काळजी घेताना

🎯 मुलांच्या केसांची काळजी घेताना

परीक्षेच्या ताणतणावातून मुक्त होऊन विद्यार्थी, लहानगे उन्हाळ्याच्या सुट्टीचा मनसोक्त आनंद लुटताने दिसताहेत. दिवसभर ऊन, वारा, माती व प्रदूषणामुळे मुलांचा अवतार होऊन बसतो. त्यामुळे मुलांच्या शारीरिक स्वच्छतेबरोबरच केसांकडे लक्ष देणे आवश्यक असते. नाहीतर त्यांची केसं खराब होऊ शकतात. म्हणूनच मुलांच्या केसांची कशी काळजी घ्यावी त्यावर एक नजर...

👉 मुलांचे केस मोकळे सोडल्याने खेळताना धूळ, माती व प्रदूषणामुळे केस गुंतून खराब होतात. त्यामुळे मुलांची केसं मोकळे सोडू नका.

👉 मुलांचे केस नेहमी मॉईश्चराईझ करा. यामुळे केसं स्मूथ होतात.

👉 एक दिवसाआड खोबरेल तेलाने किंवा ऑलिव्ह ऑईलने मुलांच्या केसांना मालिश करा.

👉 आठवड्यातून दोन-तीनदा मुलांचे केस शॅम्पूने धुवा. जर मुलांचे केस जास्त लांब असतील तर कंडिशनरचा वापर करा.

👉 मुलांच्या केसांचा गुंता झाला असेल तर तो काढण्यासाठी हेअर ब्रशचा वापर करा. यामुळे केस गळणार नाही.

👉 केस बांधण्यासाठी क्लिप किंवा हेअर बॅन्डचा वापर करा.

🎯 मुलांच्या तल्लख बुद्धिसाठी

👉 मुलांना डाळिंबाचा ज्यूस प्यायला द्या. कारण यामधील अॅंटीऑक्सिडंट ब्रेन सेल्स डॅमेज होण्यापासून वाचवतात.

👉 अॅलोव्हेरा ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन बी-6 असतात यामुळे मुलांची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते.

👉 मुलांना नारळपाणी दिल्याने मेंदूला फॅट मिळतात. यामुळे बुद्धी तीक्ष्ण होऊन एकाग्रता वाढण्यास मदत होते.

👉 मुलांना बीटाचा रस दिल्याने मेंदूपर्यंत जाणारा रक्तप्रवाह वाढवतो.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?