प्रवास करताना मळमळ होते..?

👉 प्रवास करताना मळमळ होते..?

उन्हाळ्याच्या सुट्ट्या व लग्नसराईचे दिवस असल्याने अनेकांना नको असताना प्रवासाला सामोरे जावे लागते. कारण काही जणांना प्रवासादरम्यान ओकारी किंवा मळमळ होते असते. ही कटकट नको म्हणून अनेक जण प्रवास करणे टाळतात. ज्यांना प्रवास करणे आवडते पण मळमळीच्या काटकटीमुळे प्रवास करणे टाळत असाल तर टेन्शन घेऊ नका. कारण प्रवास करताना मळमळ थांबवता येऊ शकते. कशी ते पाहूया...

👉 वेलची : प्रवासात जाण्याच्या आधी वेलची टाकलेला चहा पिल्यास प्रवासात आरामात मिळतो. तसेच सोबत वेलची नेऊन चघळल्यास मळमळ होत नाही.

👉 आले : आल्यामध्ये ऍन्टी एमेटिक तत्व असतात त्यामुळे आल्याचे प्रवासात सेवन केल्यास ओकारी आणि मळमळीपासून आराम मिळतो.

👉 पुदिना : प्रवासाला निघताना एका बाटलीत लिंबू आणि पुदिन्याचा रस सोबत न्या. जमल्यास त्यात काळे  मिठं टाकलत तर फायदाच होईल. यामुळे ओकारी व मळमळ दूर होते.

👉 लवंग : तुम्ही प्रवासात असाल तेव्हा कुटलेली एक चिमूट लवंग साखर किंवा काळ्या मिठासोबत खाल्ली की मळमळीपासून आराम मिळतो. त्यामुळे प्रवासात नेहमी लवंग सोबत ठेवावी.

👉 लिंबू : लिंबू हे ओकारी आणि मळमळीवर एक प्रभावी औषध आहे. त्यामुळे प्रवासाला जाताना लिंबू सोबत घेऊन जा. जेव्हा मळमळ वाटेल तेव्हा लिंबाचा वास घ्या.

👉 जलजीरा : ओकारीवर उत्तम औषध म्हणजे जलजिरा. यामुळे शरीराला थंडावाही मिळतो व  मळमळही थांबते.

👉 मिरे : लिंबावर मिरे पावडर आणि काळं मीठ टाकून ते चाटल्यास ओकारीपासून आराम मिळतो. त्यामुळे प्रवासात सोबत मिरे असुद्या.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?