भाग्यवंत मी कृषी मार्केटिंग वाला

🔲🌹 " भाग्यवंत मी   कृषी मार्केटिंग वाला🌹🔲          

देवा फार छान केलंस ....................
मला    कृषी मार्केटिंग वाला बनवलंस ..........म्हणून !

डॉक्टर बनवले असते तर ................
नाराज चेहरे पाहावे लागले असते .

इंजिनिअर बनवले असते तर .............
दिवसभर निर्जीव यंत्र पाहावे लागले असते .

वकील बनवले असते तर ...................
इच्छा नसतांना बोलावे लागले असते .

बँक अधिकारी बनवले असते तर .........
दुसऱ्याचे धन सांभाळत बसावे लागले असते .

नेता बनवले असते तर ...... नाईलाजाने
सगळ्यांची मने धरावी लागली असती .

🌹👏   शेतकरी म्हणजे देव कसा असतो
           त्याचे साक्षात रूप ...निर्मळ मन
           व   जगाचा पोशिंदा !

देवा तू माझी किती काळजी घेतलीस
हे मला आत्ता कळलं

            रोज शेतकरी रूपाने तुझे अनंत
            रूप दाखवतोस

दिवसभर माझ्याशी हसतोस ,बोलतोस
खरंच मी किती भाग्यवान.... ................
कि दररोज तुझी भेट होते .

             साधुसंत किती जप-तप करतात?
             तरी तू त्यांना रोज भेटत नाहीस .

या जन्मी तुला रोज भेटण्याची...................                      सेवा दिल्या बद्दल किती आभार मानू .

             म्हणून तर मोठमोठे नेते देखिल
             शेतकऱ्यांना भेटून आनंदी होतात.

देवा..... तुझे आभार मानायला ................
माझ्या जवळ शब्दच नाहीत .

🌹👏👍 --- देवा फार छान केलंस .........
                     मला  शेतकरी सेेवेसाठी बनवल

🙏🙏🙏🙏
                      
     स्वप्निल भि. आव्हाड, माळवाडी   🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?