वाढवा चेहऱ्याचे सौंदर्य...

वाढवा चेहऱ्याचे सौंदर्य....

आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याचे घरगुती उपाय खूप आहेत मग उगीच कशाला ब्युटीपार्लर, किंवा महागड्या क्रीम वापरायच्या ? त्यासाठी तुम्हाला घरच्या घरी वापरता येतील अशा काही टिप्स

🍄 दुध : .दुधामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रोटीन असतात. यामध्ये अनेक प्रकारचे विटामिन आणि खनिजांचाही समावेश होतो. जर तुमच्या भुवया विरळ असतील तर रात्री झोपताना कच्चे दूध भुवयांवर लावा. रात्री झोपण्याच्या अगोदर कापूस दूधात भिजवा आणि हलकेच भुवयांजवळ लावा. यामुळे भुवयांची वाढ लवकर होईल.

🍄 लिंबू : लिंबाचे साल आणि नारळाच्या तेलाचे मिश्रण तयार करा हे मिश्रण रात्रभर भुवयांवर लावून झोपा. हा उपाय नियमितपणे केल्यास भुवया दाट होतील.

🍄 कोरफड : कोरफडीचे एक पान घ्या. त्याला सोलून त्यातील गर काढा. त्याला आपल्या भुवयांवर काही वेळ लावा. कोरफडीमध्ये केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असे तत्व असतात. हे आपण डोळ्यांच्या खालीही लावू शकतो . त्यामुळे काळी वर्तुळे निघून जाण्यास मदत होतो. 

🍄 मेथी : मेथीचे दाणे काही वेळ भिजवून ठेवा. त्यानंतर त्यांना मिक्सरमधून बारीक करा. आपणास वाटले तर मेथीचे दाण्यांची पावडरही बनवु शकतो. ही पावडर बदामाच्या तेलात मिसळून लावा. भुवया दाट होण्यास मदत होईल.

🍄 चेहऱ्यावर काळे डाग : ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी एक चमचा दही, १ चमचा मसूरदाळ यांची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावणे. १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुणे.

🍄 पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे :  पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावणे.

🍄  जायफळ : जायफळ पाण्यात उगळून पिंपल्स व डोळ्याभोवती काळी वर्तुळ असेल तर लावावे.

🍄  टोमॅटो : टोमॅटोचा रस १ चमचा, काकडीचा रस एक चमचा, कोबीचा रस एक चमचा हे सर्व मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग व वर्तुळे कमी होतात.

🍄  कोबी आणि जायफळ : पिंपल्स जास्त असेल तर कोबी किसुन त्यात जायफळ पेस्ट मिसळुन जाडसर भार चेहऱ्यावर देणे.

🍄  सफरचंद आणि दुध:  सुरकुत्या असेल तर सफरचंद किसून त्यात एक चमचा कच्चे दुध टाकुन व ही पेस्ट चेहऱ्यावर लावणे.

🍄  तुळशीचे पान: चेहऱ्यावर पिंपल्स व पिंपल्सचे डाग असेल तर तुळशीच्या पानाचा रस १ चमचा, १ चमचा पुदीन्याचा रस व थोडे हळद पेस्ट करून हे मिश्रण पाण्यात करुन घेणे.

🍄 चेहऱ्याव्रील व अंगावरील लव :  चेहऱ्याव्रील व अंगावरील लव कमी होण्यासाठी पपिता पावडर, नीम पावडर, मंजिष्ठा समप्रमाणात घेऊन त्यात पाव चमचा आंबेहळद टाकणे व त्याच्या चार पट मसूर डाळीचे पीठ टाकणे. कच्चा दुधात पेस्ट करून केसांच्या उलट्या दिशेने लावावे. पीठी ज्याप्रमाणे काढतो त्याप्रमाणे चोळावे नंतर साय / लोणी लावणे. कोल्ड क्रीम लावणे.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?