एमआरआय चाचणीचं कार्य कसं चालतं..?

👉 एमआरआय चाचणीचं कार्य कसं चालतं..?

एखाद्या अपघातामुळे, आजारीपणामुळे शरीरयंत्रणेत बिघाड उत्पन्न झाल्यास काही तपासण्या करण्याचा सल्ला दिला जातो. मेंदू, पाठीचा कणा, गुडघा यासारख्या अवयवांना दुखापत झाल्यास किंवा वेदना होत असल्यास डॉक्टर एमआरआय चाचणीचा सल्ला देतात. बोगद्यासारख्या दिसणार्‍या उपकरणात माणसाला झोपवलं जातं आणि त्याच्या शरीराची प्रतिमा स्क्रीनवर उमटते. मात्र ही एमआरआय चाचणी कशी असते? एमआरआय उपकरणाचं कार्य काय कसं चालतं? त्याबद्दल आज जाणून घेऊयात...

’मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंग’ हे एमआरआयचं पूर्णरूप आहे. या चाचणीला ’एमआरआय स्कॅन’ असं म्हटलं जातं. ही चाचणी अत्यंत सुरक्षित आणि वेदनारहित असते. एमआरआय चाचणीद्वारे अवयवांची प्रतिमा उमटवली जाते. क्ष-किरण किंवा इतर कोणत्याही चाचणीपेक्षा एमआरआयमुळे शरीराच्या अंतर्गत भागाची सुस्पष्ट प्रतिमा उमटते. त्यामुळे डॉक्टरांना रोगनिदान करणं सोपं जातं. अत्यंत प्रभावी चुंबकीयशक्ती आणि रेडिओ लहरींचा वापर करून एमआरआय उपकरण शरीरातल्या अंतर्गत भागाची प्रतिमा संगणकावर उमटतं.

👉 कार्डिओमुळे तुमचं वजन वाढतं..?

कार्डिओमुळे वजन वाढतं असं काही तज्ञमंडळींना वाटतं. मात्र कार्डिओ वजनवाढीला थेट जबाबदार असतं असं नाही. पण वजन कमी करण्याच्या तुमच्या उद्देशावर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. चला तर जाणून घेऊयात कोणत्या कारणांमुळे कार्डिओमुळे तुमचं वजन वाढतं...

1) कार्डिओच्या अतिप्रमाणामुळे खूप भूक लागते. यामुळे अतिखाल्ल जातं. परिणामी तुमचं वजन वाढतं.

2) वर्कआऊट सुरू केल्याने प्रोटिन आणि कार्बोहायड्रेटस् वाल्या डाएटची सुरूवात होते. या घटकांचं चरबीत रूपांतर होऊन वजन वाढतं.

3) प्रचंड ताणतणावचा सामना करावा लागत असेल तर कार्डिओचा परिणाम होत नाही. ताणामुळे कॉर्टिसॉलची शरीरातली पातळी वाढते. शरीर इन्शुलिनचा प्रतिकार करू लागतं. शरीरात चरबी साठू लागते.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?