Entrepreneur Stories

Entrepreneur

*_धंदा यशस्वी कसा करावा? पतंजली एक उदाहरण_*

रामदेव बाबांच्या आणि त्यांचे  सहकारी आचार्य बालकृष्ण ह्यांच्या पतंजलीचं यश सगळ्यांनीच पाहिलं. कर्ज घ्यायला गेले पण बँकेत खातं नाही! कुणीतरी खोडी काढायची म्हणून कोर्टात केस दाखल करतंय, त्यात ११ लाखांचा फटका! नूडल्स साठी फेक लायसन्स वापरल्याचा दावा एकीकडे तर एकीकडे तामिळनाडूत पतंजली विरोधात काढलेला फतवा. पण पतंजली ह्या सगळ्या गोष्टींना पार करून वर आलं. आणि म्हणूनच फक्त MBA च्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर नवउद्योजकांना सुद्धा हा एक आदर्श आणि शिकवणारा प्रोजेक्ट ठरला आहे. ह्यातून काय घ्यायचं?

🍄 *_यश एवढं सोप्पं नाही!_*
‘एका रात्रीतून मिळत नसतं’  हे बऱ्याचदा ऐकून झालं असेल तुमचं. खरं  तर रामदेव बाबा २००८ पासून हे स्वप्न बाळगून त्यावर काम करत होते. जगापासून लपवून त्यांनी मेहनत घेतली. तेव्हापासून पतंजली अजूनही वाढते आहे. यशाला कुठेही चोररस्ता नसतो. पतंजली कठोर परिश्रम घेऊन झगडण्याची तयारी ठेवा असं सांगते.

🍄 *_तुमची मुल्ये महत्वाची!_*
सुरुवातीपासूनच रामदेव बाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे तत्व आणि ध्येय एकच होतं. ते म्हणजे आयुर्वेदाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे. ह्यात त्यांनी कधीही तडजोड केली नाही. अश्याने त्यांना एक जबाबदार ग्राहकवर्ग मिळाला. जसजसं पतंजली कंपनी मार्केट मध्ये उतरत होती तसतशी डोळ्यात खुपत होती. म्हणूनच जारी परवान्यांचा दावा, तुपात बुरशी सापडल्याचा दावा अश्या अनेक तक्रारींनी पतंजलीचं नाव खराब करण्याचा प्रयत्न झाला तरी त्याचा परिणाम कमी पडला.

🍄 *_घाबरू नका – प्रयोगशील राहा!_*
“प्रयोग” हा एक उद्योगाला चालना आणि वाढवणारा जादुई शब्द आहे. नेहमी काहीतरी नवीन करत राहा. जेव्हा पतंजली मार्केट मध्ये येत होती तेव्हा मोठमोठ्या Fast-moving consumer goods (FMCG) कंपन्यांनी बाजार व्यापलेला होता. ह्याला न भीता पतंजलीने डौलात पहिलं पाऊल टाकलं आणि आज FMCG कंपन्यांच्या यादीत पहिलं नाव पतंजली आहे.

🍄 *_नेहमी काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न करा!_*
व्यवसायात टिकून राहायचं असेल तर नुसतं कल्पना चांगली असून चालत नाही. सतत सुधारणा आणि नवनवीन गोष्टींना आत्मसात करावं लागतं. जसं पतंजली एका उत्पादनावर थांबली नाही. खाद्यपदार्थ, साबण, शॅम्पु, कॉस्मेटिक्स आणि बरेच उत्पादनांत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.

*_(आमच्यासोबत सहभागी होण्यासाठी या क्रमांकावर 7385-955-955 आणि आपल्या शहराचं नाव व्हाट्स अप करा)_*

🍄 *_श्रेय लाटण्यापेक्षा वाटा!_*
श्रेय हा प्रगतीच्या वाटेवर एक मोठा अडसर आहे. प्रत्येक जण श्रेय मिळावं म्हणून हावरटासारखं वागतो. रामदेव बाबा जेव्हा मुलाखत देत असतात तेव्हा पतंजलीच्या हरिद्वार आणि नेपाळयेथील युनिट्स ला श्रेय देतात. ह्या युनिट्स च्या कामाचं ते नेहमी कौतुकी करतात. अश्याने कर्मचाऱ्यांना काम करायला हुरूप येतो.

🍄 *_बाजारपेठेची नस ओळखा!_*
“प्रत्येक गर्दीत एक बाजारपेठ असते.” व्यवसाय करायचा म्हणजे सगळ्यात आधी हा मंत्र माहित असावा. रामदेवबाबांनी सामान्यांची अडचण ओळखली आणि उत्पादनाची पत उत्कृष्ट ठेवण्यावर भर दिला. MBA लोकांना भरती करून घेण्यापेक्षा त्यांनी त्या त्या क्षेत्रातील पारंगत लोकांना घेतलं. याचा  फायदा असा झाला की पतंजलीचा प्रसार आणि मार्केटिंग वर होणारा पैसे वाचवला.

🍄 *_जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा!_*
पतंजलीच्या सगळ्यात चांगलं आणि एक बुस्टर देणारं पाऊल ठरलं ते म्हणजे २००९ मध्ये पित्ती ग्रुप आणि बियाणी ग्रुप शी झालेलं मर्जर. पतंजलीची उत्पादने एकाच वेळी देशभरात ४७०० रिटेल स्टोअर्स मध्ये उपलब्ध होते. सोबतच हायपर सिटी, स्टार बझार आणि रिलायन्स च्या अनेक स्टोअर्स मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. आपलं उत्पादन लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध होईल ह्याची काळजी घ्यायची.

✍🏻स्वप्निल भि. आव्हाड. माळवाडी✍🏻

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?